शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एकरात साडेसात लाखांची सेंद्रिय फूलशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:08 IST

मोहन मगदूम । लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथील सतीश मगदूम यांनी एक एकर शेतात कोणत्याही रसायनिक खतांचा वापर ...

मोहन मगदूम ।लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथील सतीश मगदूम यांनी एक एकर शेतात कोणत्याही रसायनिक खतांचा वापर न करता शेवंती, झेंडू, गलांडा, अ‍ॅस्टर या फूलझाडांची लागवड केली आहे. या फूल शेतीतून साडेसात लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.सतीश यांनी एक एकरात साधारण तीन ते चार महिन्यांपूर्वी झेंडू, शेवंतीच्या रोपांची बेड पद्धतीत लागवड केली. यामध्ये ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन करण्यात आले. योग्य पाणी व सेंद्रिय खतांची मात्रा दिल्याने रोपांची वाढही चांगली झाली आहे. अडीच महिन्यानंतर शेतातील दुतर्फा लाकडी मंडप तयार करून झाडांना आधार दिला. चांगल्या दर्जामुळे बाजारभावही चांगला मिळतो. सध्या शेवंतीची बाग फुलांनी बहरली आहे. परिपक्व फुलांची तोडणी केली जात आहे. दररोज शंभर ते सव्वाशे किलो फुलांचे उत्पादन मिळत आहे. तोडलेली फुले मिरज बाजारात विक्रीसाठी पाठविली जात आहेत. प्रतिनुसार फुलांना प्रतिकिलो ५० ते २०० रुपये दर मिळत आहे. सतीश यांच्या आई विमल यांची या फूलशेतीमध्ये मोठी साथ आहे. नियमित पहाटे चार वाजता सतीश व आई हे दोघे फुलांची तोड करतात. याच उत्पन्नातून सतीश यांनी यावर्षी चारचाकी गाडीही खरेदी केली आहे.सध्या ते दररोज मिरज शहरात फुले विक्रीसाठी स्वत:च्या चारचाकीतून जातात. याशिवाय त्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांना फूल शेतीचे मार्गदर्शन करून हजारो रुपयांचे उत्पादन मिळवून दिले आहे. सतीश यांच्या उत्पादनास सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि कर्नाटकमधून मागणी आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसºयावेळी या फुलांना चांगला दर मिळाला. आणखी उत्पादन निघणार असून, सणांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या बाजारपेठेतून झेंडूची विक्री केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘फुलराणी’ची प्रतीक्षासेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फुले घेण्यासाठी मिरज, सांगली फूल बाजारपेठेत सतीश यांच्या ‘फुलराणी’ या गाडीची व्यापारी वाट पाहत असतात. ताजी व सुंदर फुले असल्याचा विश्वास सतीश यांनी संपादन केला आहे. यामुळे सध्या लग्नसराईमध्ये व विविध कार्यक्रमांमध्ये हारतुरे व सजवटीचे कामदेखील त्यांना मिळत आहे.लिंगनूर (मगदूमवाडी, ता. मिरज) येथील सतीश मगदूम यांनी सेंद्रिय पद्धतीची फूलशेती फुलवली आहे.