उमदी : सोन्याळ, ता. जत येथील नदाफ फाटा येथे राहणाऱ्या खाजेवली बापूसो नदाफ यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील एकूण एक लाख ३१ हजार रुपयांच्या किमती वस्तू व हिरो होंडा मोटारसायकल चोरली आहे. याची नोंद उमदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
यामध्ये २४ हजार रुपये किमतीच्या तीन ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या, दहा हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, तीन हजार रुपये किमतीच्या लहान मुलांच्या तीन अंगठ्या, १५ हजार रुपयांची बोरमाळ, १३ हजार रुपयाची गळ्यातील सोन्याची चेन, २० हजार किमतीचा गळ्यातील सोन्याचा दागिना, सहा हजार रुपयांचे वेगवेगळ्या आकाराचे पाचशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, ४० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण माल अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सपोनि पंकज पवार करीत आहेत.