शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेला मिळाला आश्रमाचा आसरा<bha>;</bha>

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील मुख्य बसस्थानकावर दोन दिवसांपासून मुक्कामाला असणार्‍या आजीबाईंची अखेर पोलिसांनी वृद्धाश्रमात व्यवस्था केली. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : येथील मुख्य बसस्थानकावर दोन दिवसांपासून मुक्कामाला असणार्‍या आजीबाईंची अखेर पोलिसांनी वृद्धाश्रमात व्यवस्था केली. या वृद्धेला आसरा मिळाल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलिसांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य बसस्थानकात ६५ ते ७० वर्षांची एक वृद्धा दोन दिवसांपासून मुक्कामाला होती. बसस्थानकावरील पोलीस कर्मचारी मुल्ला यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी काॅन्स्टेबल रणजित जाधव यांना वृद्धेबाबत माहिती दिली. जाधव यांनी वृद्धेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पण तिला फारसे काही आठवत नव्हते. थंडीच्या दिवसात बसस्थानकात या महिलेचे होणारे हाल पाहून, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, सहायक निरीक्षक रांजवे यांनी तिची चांगल्या ठिकाणी व्यवस्था करण्याची सूचना केली.

याचदरम्यान मिरजेतील आश्रमाचे अध्यक्ष श्रीकांत लोखंडे यांनीही पोलिसांशी संपर्क साधून, या वृद्धेची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना आश्रमात सोडले. सध्या त्या सुखरूप असून सोशल मीडियावरून त्यांच्याबद्दलचा कोणताही संदेश व्हायरल करू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

चौकट

वृद्ध महिला आष्ट्याची?

या महिलेबाबतचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना कोल्हापूर, इस्लामपूरमध्ये पाहिल्याचे दूरध्वनी आले. पण त्यांच्याबाबत काहीच खातरजमा होऊ शकली नाही. त्यांच्याकडे आष्टा येथील आधारकार्ड सापडले आहे. त्यामुळे ती आष्टा येथील असावी, अशी शक्यता आहे.