शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा लवकरच बदलून देऊ

By admin | Updated: May 25, 2017 23:22 IST

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा लवकरच बदलून देऊ

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : राज्यात कर्जमाफीसाठी विरोधक आग्रही असले तरी, मागच्यावेळी झालेली कर्जमाफी निव्वळ धनदांडग्यांना मिळाली होती. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय होईल, असे मत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या खात्यातील पैशाची चौकशी पूर्ण झाली असून, लवकरच त्या जुना नोटा बदलून मिळतील, असेही ते म्हणालेसावळज (ता. तासगाव) येथे झालेल्या शेतकरी संवाद यात्रेप्रसंगी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंंह देशमुख उपस्थित होते.पालकमंत्री देशमुख म्हणाले की, कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल; कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीच्या काळात राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटा बऱ्याच महिन्यांपासून जिल्हा बँकांकडे तशाच पडून आहेत. जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या खात्यातील पैशाची चौकशी पूर्ण झाली असून त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाशी चर्चा झाली आहे. लवकरच त्या जुना नोटा बदलून मिळतील. शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. पीककर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही. गरज भासल्यास शिखर बँकेकडून कर्जपुरवठा केला जाईल. पाटील म्हणाले, सावळजसह आठ गावात पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेतून पाणी देण्याचे नियोजन आहे. या कामाची निविदा निघाली असून कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच टेंभूचे पाणी सावळजच्या शिवारात येईल.यावेळी जलयुक्त शिवार योजनेतून अग्रणी नदी पुनरुज्जीवनाच्या कामाला पालकमंत्री देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.शिवार संवाद यात्रेकडे शेतकऱ्यांची पाठराज्यातील विरोधकांच्या संघर्ष यात्रेनंतर सत्ताधारी भाजपने राज्यात शिवार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. तासगाव तालुक्यातील सावळज येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवार संवाद यात्रेकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह सांगली जिल्ह्यातील खासदारांसह भाजपची नेतेमंडळी उपस्थित असलेल्या या संवाद यात्रेत शेतकऱ्यांशी संवाद झालाच नाही.