शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन लॉटरी कोमात, आॅफलाईन मटका जोमात

By admin | Updated: August 24, 2016 23:44 IST

इस्लामपुरातील चित्र : अवैध व्यवसायांचा उच्छाद, पोलिसांचे दुर्लक्ष, महाविद्यालयीन विद्यार्थीही बळी

अशोक पाटील -- इस्लामपूर  -आघाडी सरकारच्या काळात राज्याची तिजोरी मालामाल करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आॅनलाईन लॉटरी बाजारात आणली. हा लॉटरी उद्योग जोमात चालण्यासाठी मटका, जुगार आणि खासगी सावकारीला तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी निर्बंध घातले. मात्र आता इस्लामपुरात पुन्हा या अवैध व्यवसायाने डोके वर काढले असून आॅनलाईन लॉटरी कोमात गेली आहे, तर आॅफलाईन मटका जोमात सुरू आहे.युती शासनाच्या काळात राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता, असा आघाडी शासनाचा दावा होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमदार जयंत पाटील यांच्या हातात दिल्या. त्यांनी हे खाते सक्षमपणे चालवत, विविध मार्गाने तिजोरीत पैसा कसा येईल हे पाहिले. प्रामुख्याने त्यांनी आॅनलाईन लॉटरीला पसंती दिली. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू लागला. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मटका, जुगार, इतर अवैध व्यवसाय बंद केल्याने हा ग्राहक आॅनलाईन लॉटरीकडे आपोआपच वळला. आता सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने आघाडी शासनाचे काही निर्णय रद्द केल्याने, पुन्हा एकदा मटका, जुगार, डान्स बार, खासगी सावकारी यांना ऊत आला आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात खमक्या अधिकाऱ्याची नेहमीच वानवा राहिली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात गुन्हेगारीसह अवैध व्यवसायांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली बेकायदेशीर मटक्याचा व्यवसाय राजरोस सुरु आहे. या व्यवसायातही मोठी स्पर्धा सुरु झाली असून चौका-चौकातील मोक्याच्या ठिकाणी आता मटका घेणाऱ्या खोक्यांची संख्या वाढली आहे.वाळवा तालुक्यात आता खासगी सावकारीही जोमात सुरु आहे. शहरातील काही नेते स्वत:च्या संस्थेतील पैसे गुंडांमार्फत सावकारीसाठी वापरु लागले आहेत. यामध्ये काही बचत गटांचाही समावेश आहे. भिशीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी सुरु आहे. इस्लामपूर मतदार संघातील आमदार जयंत पाटील यांनी अर्थमंत्री असताना राज्याच्या हिताचे निर्णय घेतले होते. आता त्यांच्याच मतदारसंघातील राजकीय काही नेत्यांच्या अशिर्वादाने आॅफलाईन मटका जोमात सुरु केला आहे. या उद्योगाला पोलिस अधिकाऱ्यांचा अभय असून, मटका, जुगार आणि इतर अवैध व्यवसायाने उच्छाद मांडला आहे. या परिसरात शिक्षणासाठी व विविध कामांसाठी येणारे महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणही अवैध व्यावसायाचे बळी पडत आहेत. याप्रश्नी आता आमदार पाटील यांनी स्वत: लक्ष घालून अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.पतसंस्थेचा पैसा खासगी सावकारीलापेठ परिसरातील एका नामांकित पतसंस्थेने खासगी सावकारीचा धंदा तेजीत आणला आहे. बोगस बचत गटाच्या नावे कर्ज प्रकरण करुन तो पैसा गरजूंना बेकायदेशीररित्या मासिक १५ ते २0 टक्के दराने दिला जात आहे. याची वसुली वेळेत न झाल्यास प्रसंगी गुंडांचाही वापर केला जात आहे. अशा व्यवसायात बहुतांशी पतसंस्था आणि सुवर्ण व्यावसायिक गुंतल्याचे समजते.इस्लामपूर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांमुळे अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. जोपर्यंत असे उद्योग बंद होत नाहीत, तोपर्यंत सामान्य नागरिकांना पोलिस न्याय देऊ शकणार नाहीत. हे अवैध उद्योग तातडीने बंद न झाल्यास आम्हाला पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.- विक्रमभाऊ पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो, इस्लामपूर.