शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अधिकारी बदल्यांची पदाधिकाऱ्यांना धास्ती

By admin | Updated: April 12, 2016 00:36 IST

इस्लामपूर पालिकेचा कारभार : रदबदलीसाठी अनेकांची मंत्रालयापर्यंत फिल्डिंग

अशोक पाटील -- इस्लामपूर --पदाधिकाऱ्यांच्या धोरणावर अधिकाऱ्यांच्या कामाची रूपरेषा ठरते. पदाधिकारी बदलला की अधिकारी बदलण्याची शक्यता असते. या राजकीय अदलाबदलीत प्रशासनातील अधिकाऱ्यांवर नेहमीच टांगती तलवार असते. परंतु इस्लामपूर पालिकेत उलटे चित्र आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे इस्लामपूर पालिकेतील पदाधिकारीच धास्तावले आहेत.याबाबत माहिती अशी, इस्लामपूर पालिकेतील बांधकाम अभियंता शामसुंदर खटावकर यांची बदली बुलडाणा येथे झाली. ते इस्लामपूर येथे या पदावर ३० वर्षाहून अधिक काळ कार्यरत होते. गेल्या ३0 वर्षात विकास कामांचा बोजवारा उडाला आहे. बहुतांशी विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. यामध्ये संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहाराचे घोंगडे आणि काळ्याचे पांढरे केलेल्या कागदपत्रांची रद्दी होईपर्यंत खटावकर यांची बदली स्थगित करण्यासाठी पालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी शासनदरबारी चांगलीच फिल्डिंग लावली होती. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही.नियोजित विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी प्रलंबित आहे. या आराखड्यात झालेल्या बेकायदेशीर त्रुटींचा मुख्य सूत्रधार नगररचना अधिकारी एस. एम. कांबळे असले, तरी त्यांच्या पडद्यामागचे कलाकार वेगळेच असल्याचे बोलले जाते. या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या काळ्या कृत्यांच्या फायली कांबळे यांच्या दप्तरात अडकल्या आहेत. यदाकदाचित कांबळे बदलून गेल्यास या दप्तरातून स्फोटक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मथुरेतील गुण्यागोविंदाने लोणी खाणाऱ्या कांबळे यांची बदली स्थगित करण्यासाठी काही बडे नेते आणि वरिष्ठ अधिकारी भाजप नेत्यांच्या पायावर लोटांगण घालत आहेत. कसल्याही परिस्थितीत कांबळे यांची बदली रद्द करणारच, असा पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे.बांधकाम विभागातील अविनाश जाधव, पाणी पुरवठा अधिकारी आर. आर. खांबे, आस्थापनाचे मोहन माळी, कर निरीक्षक आनंदा कांबळे यांच्याही बदलीचे आदेश आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करण्यासाठी नगरविकास खात्याने आदेश दिले आहेत. तरीसुध्दा सत्ताधारी पदाधिकारी या अधिकाऱ्यांची बाजू घेऊन व दबाव टाकून शासकीय सेवेत न राहता पालिका सेवेत समाविष्ट होण्यासाठी आग्रह करीत आहेत. यामागे नेमके काय गुपित आहे, याची चर्चा नागरिकांतून चांगलीच रंगू लागली आहे. एकूणच अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी पदाधिकारी का धास्तावले आहेत? हा प्रश्न उपस्थित होत आहे.नोटरीचा असाही वापरगेल्या ३० वर्षांहून अधिक काळ विकास आराखड्याचा प्रश्न टांगणीवर आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला स्वत:चे घर मिळत नाही. मिळालेले घर व जागा शहरातील भूखंडमाफिया आणि गावगुंड बेकायदेशीरपणे कुंपण घालून त्याचे नोटरीद्वारे परस्पर व्यवहार करतात. हा व्यवहार करताना नोटरी हा प्रकार तेजीत आला आहे. बांधलेली काही घरे कायदेशीर करण्यासाठी मूळ मालकाकडून केलेल्या नोटरीचे रूपांतर खरेदीत करण्यासाठी मूळ मालक आता लाखो रुपयांची मागणी करत आहेत. अशा बेकायदेशीर कृत्यांना पालिकेतील अधिकारी व पदाधिकारी खत-पाणी घालतात.टोलेजंग इमारती : कायद्याचा भंगइस्लामपूर शहरात भूखंड माफियांनी केलेला उच्छाद, बेकायदेशीर भूखंड कायदेशीर करुन सर्वसामान्यांचे भूखंड हडप करण्याच्या प्रकारामध्ये पालिकेतील अधिकाऱ्यांचाच हात आहे. शहरात होत असलेल्या टोलेजंग इमारतींना परवानगी देताना कायद्याचा भंग केला जात आहे. परंतु सर्वसामान्यांच्या गुंठेवारीच्या फायली मात्र आजही ढिगाऱ्याखाली दडपल्या गेल्या आहेत. यामागचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होताना, पालिकेतील अधिकारी आणि महसूल विभागाच्या धोरणाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.