शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पदाधिकाऱ्यांची गावे आरोग्य सेवेपासून वंचित

By admin | Updated: March 11, 2015 00:11 IST

तपासणीत स्पष्ट : सागाव, येलूर, दिघंचीचा कारभार चांगला

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तीन सभापतींच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार ढिसाळ असल्याचे तेथील कामगिरी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सागाव, येलूर आणि दिघंची केंद्रांची कामगिरी उत्तम असून त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘टॉप टेन’च्या यादीत एकाही पदाधिकाऱ्याचे आरोग्य केंद्र नाही.प्राथमिक आरोग्य केंद्रातून ग्रामीण जनतेला मूलभूत सुविधा दिल्या जातात का, प्रसुती किती झाल्या आदींचा विचार करून जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांतून ‘टॉप टेन’ आरोग्य केंद्रांची निवड केली जाते. फेब्रुवारी महिन्याच्या पाहणीमध्ये शिराळा तालुक्यातील सागाव आरोग्य केंद्रास शंभर पैकी ९८ गुण मिळाल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. येलूर (ता. वाळवा) केंद्राने ८५ गुण मिळवून द्वितीय, तर दिघंची (ता. आटपाडी) केंद्राने ८० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मिरज तालुक्यातील खंडेराजुरी (गुण ७९), नांद्रे (७७), देशिंग (७४), एरंडोली (६३), तासगाव तालुक्यातील हातनूर (७०), मणेराजुरी (६२) शिराळा तालुक्यातील शिरसी (६२) या केंद्रांचा ‘टॉप टेन’मध्ये समावेश आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या गावातील आरोग्य केंद्रांचा कारभार ढिसाळ असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. उमदी हे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांचे गाव आहे, परंतु येथील आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे दिसत आहे. या आरोग्य केंद्राला शंभरपैकी केवळ १४ गुण मिळाले आहेत. यामुळे त्यांचा गुणानुक्रम हा ५० पर्यंत खाली गेला आहे. आटपाडी हे तर सभापती उज्वला लांडगे आणि सभापती मनीषा पाटील या दोन्ही सभापतींचे गाव. येथील आरोग्य केंद्रास केवळ १० गुण मिळाले आहेत. त्यांचा गुणानुक्रम ५३ आहे. याशिवाय, दहा आरोग्य केंद्रांच्या यादीत उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती पपाली कचरे, गजानन कोठावळे यांच्या आरोग्य केंद्रांचा समावेश नाही. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील टॉप टेन केंद्रेप्रा.आ.केंद्रगुणगुणानुक्रमसागाव९८१येलूर८५२दिघंची८०३खंडेराजुरी७९४नांद्रे७७५देशिंग७४६हातनूर७०७एरंडोली६३८शिरशी६२९-१०मणेराजुरी६२९-१०