शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘लाचलुचपत’चा अधिकाऱ्यांनी घेतला धसका

By admin | Updated: December 12, 2014 23:36 IST

जतमधील स्थिती : कर्मचारीही धास्तावले; नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन महिन्यात तिघांवर कारवाई

जयवंत आदाटे - जत -सांगली लाचलुचपत विभागाने मागील तीन महिन्यात जत तालुक्यातील तीन जणांवर कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या घटनांमुळे येथील सर्वच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा धसका घेतला आहे. त्यामुळे टेबलाखालील सर्वच आर्थिक व्यवहार आता सावधानता बाळगून होऊ लागले आहेत.जत तालुक्यातील नागरिकांत अन्यायाच्या विरोधात उठाव करण्याची मानसिकता निर्माण होत आहे. सोशल मीडियाचा प्रभाव त्यांच्या मनावर होत आहे. प्रशासकीय कार्यालयात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून नियमानुसार काम होत नसेल, तर त्याचा जाब नागरिक आता संबंधितांना विचारू लागले आहेत. जत तालुक्यातील नागरिक मवाळ धोरणाचे आहेत. त्यांची पिळवणूक करून कितीही आर्थिक शोषण केले तरी, ते काही बोलत नाहीत, अशी मानसिकता तालुक्यात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांची यापूर्वी होती. परंतु त्यात आता बदल जाणवू लागला आहे.जत शहर वीज वितरण कार्यालयातील शाखा अभियंता अमीर शेख यांनी एकाच गावातील शेती विद्युत मीटरचे वीज कनेक्शन जत शहरातील नातेवाईकास बदलून देण्यासाठी पाच हजार रुपये मागितले. संबंधितांनी त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर २२ आॅगस्ट २०१४ रोजी वीज वितरण कार्यालयात त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे. जत पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सीमा आघाव व त्यांचे पती दत्तात्रय बढे यांनी बिळूर (ता. जत) येथील एका परस्परविरोधी तक्रार असलेल्या प्रकरणातील आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी संबंधिताकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी चार हजार रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा आघाव यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई ७ नोव्हेंबर १४ रोजी केली आहे.जत भूमिअभिलेख कार्यालयातील उमेदवार सुरेश साळुंखे यांनी नियमानुसार वारसा नोंद करण्यासाठी दहा हजार रुपये संबंधितांकडे मागितले होते. त्यापैकी आठ हजार रुपये स्वीकारताना या कार्यालयातच २७ नोव्हेंबर रोजी त्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील साळुंखे हा एक छोटा मासा होता. या प्रकरणातील मोठे मासे मात्र नामानिराळे आहेत. साळुंखे हे अधिकृतरित्या शासकीय सेवेत नाहीत. परंतु ते कोणासाठी काम करत होते आणि त्यांनी कोणासाठी पैशाची मागणी केली होती, याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न होणार असली तरी, जनतेसमोर त्यांची नावे उघड होणे आवश्यक आहे. बदली रद्द करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहारजिल्हा प्रशासनाकडून एखादा अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला शिक्षा देण्यासाठी त्याची जत तालुक्यात यापूर्वी बदली करण्यात येत होती. त्यानंतर येथे आलेले कर्मचारी व अधिकारी परत तालुका सोडण्यास तयार होईनासे झाले. इतरत्र झालेली बदली रद्द करण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये खर्च होऊ लागले. यामागील गौडबंगाल काय आहे, हे लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात मागील पंधरा-वीस वर्षात काम करून इतरत्र बदली होऊन गेलेल्या अधिकाऱ्यांची व त्यांच्या नातेवाईकांची पूर्वीची आणि आताची मालमत्ता यातील तफावत किती आहे, याची चौकशी झाल्यास त्यांचे पितळ उघडे पडणार आहे.