शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य रंगणार

By admin | Updated: January 5, 2016 00:55 IST

जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे ‘नॉट रिचेबल’ : पदाधिकारी बदलाची प्रक्रिया रखडणार

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षांसह चार सभापतींना राजीनामा देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी देऊनही, उपाध्यक्षांसह दोघे सभापती वगळता इतरांनी राजीनामा देण्यास चालढकल सुरू केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिल्याने, त्यांचे पती तानाजी पाटील यांची नेत्यांकडून मनधरणी सुरू आहे. तसेच सभापती उज्ज्वला लांडगे यांनीही सोमवारी राजीनामा सादर केला नसल्याने, पदाधिकारी बदलाची प्रक्रिया रखडणार आहे. दरम्यान, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, महिला व बालकल्याण सभापती पपाली कचरे यांनी शनिवारीच अध्यक्षा होर्तीकर यांच्याकडे राजीनमा सुपूर्द केला आहे. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्ज्वला लांडगे या पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असल्यामुळे, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लिंबाजी पाटील, कोठावळे आणि कचरे यांनी शनिवारी राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे. सभापती उज्ज्वला लांडगे सोमवारी राजीनामा देणार होत्या. मात्र, त्यांनीही नेत्यांना हुलकावणी दिली. या पार्श्वभूमीवर मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे नेत्यांची पंचाईत झाल्याने, अखेर त्यांचे पती तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाची संधी देण्याचा शब्द दिला होता. नेत्यांनी हा शब्द पाळावा, असे तानाजी पाटील यांनी सांगितले होते. सोमवारी सायंकाळीही याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि तानाजी पाटील यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त होते. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. याबाबत जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते ‘नॉट रिचेबल’ होते. (प्रतिनिधी)पदाधिकारी निवडी रखडणारपक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिल्यानंतर पदाधिकारी निवडीत संधी मिळण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांमार्फत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. सभापतींनी राजीनामा सादर केला नसल्याने इच्छुकांत अस्वस्थता आहे.