शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘सोशल मीडिया’वरून मनपा आयुक्तांबद्दल आक्षेपार्ह मजकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:58 IST

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबद्दल शनिवारी रात्री सोशल मीडियावरुन (व्हॉटस्-अ‍ॅप) आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आल्याने प्रचंड ...

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याबद्दल शनिवारी रात्री सोशल मीडियावरुन (व्हॉटस्-अ‍ॅप) आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला.ही पोस्ट टाकणाऱ्या संशयितास अटक करावी, या मागणीसाठी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाºयांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आयुब पटेल (रा. सांगली) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्याएका ग्रुपवरुन खेबूडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. ही पोस्ट संशयित आयुब पटेल यांनी ‘व्हायरल’ केली. महापालिकेतील एका कर्मचाºयाच्या मोबाईलवर ही पोस्ट आली. संबंधित कर्मचाºयाने वरिष्ठ अधिकाºयांना याची माहिती दिली. त्यानंतर रात्री अकरा वाजता उपायुक्त पाटील यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील नव्हते. ठाणे अंमलदारांनी साहेब आल्याशिवाय मला तक्रार घेता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. शेवटी तंत्र व्यवस्थापक (सिस्टिम मॅनेजर) नकुल जकाते यांनी फिर्याद दिली. यावर पोलिसांनी लेखी फिर्याद देण्याची मागणी केली. लेखी दिल्यानंतर ती पुन्हा आॅनलाईन दाखल करून घेण्यात आली. पण कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करायचा, यावरून मध्यरात्री दोनपर्यंत हा गोंधळ सुरू होता.शासनाकडे तक्रार करणारमहापालिकेच्या अधिकाºयांची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर आपले सरकार या पोर्टलवर महापालिकेच्यावतीने तक्रार करण्यात आली. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते, गटनेते यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. महापालिका अधिकारी, कर्मचाºयांना त्रास देणाºयांविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली जाणार आहे.अदखलपात्र गुन्हापोलिसांनी पटेल यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी कर्मचाºयांनी पुन्हा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी पटेल यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सोडून दिले आहे, असे सांगितले. दुपारी बारा वाजता कर्मचारी निघून गेले.