लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात सध्या एक हजार १२१ क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या आहे. यापैकी ७८६ रुग्णांना शासनाकडून प्रति महिना ५०० रुपये पोषण भत्ता देण्यात येत असून या भत्त्यापासून जिल्ह्यातील ३३५ क्षयरोगाचे रुग्ण वंचित राहिले आहेत. या रुग्णांची बँक खात्यासह आवश्यक कागदपत्रे न दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
चौकट
जिल्ह्यातील क्षयरोगी : ११२१
भत्ता कितीजणांना मिळतो : ७८६
आजार व भत्ता न मिळणाऱ्यांचे प्रमाण : २९.८८ टक्के
चौकट
टीबीची लक्षणे काय?
-१५ दिवसांपेक्षा जास्त बेडकायुक्त खोकला.
-हलकासा व रात्री येणारा ताप.
-वजन कमी होणे
-भूक कमी होणे,
-बेडक्यातून रक्त येणे, छातीत दुखणे
चौकट
जास्तीत जास्त २४ महिन्यांपर्यंत टीबीमुक्त
टीबीचे लक्षणे आढळून येताच त्याचे निदान झाले तर औषधोपचाराने ६ महिन्यांत टीबी पूर्णपणे बरा होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार न घेतल्यास तो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्याकरिता १८ ते २४ महिने औषधोपचार घ्यावे लागतात. यातून रुग्ण बरा होतो.
कोट
१५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, ताप, खोकल्यातून रक्त पडणे असे लक्षणे आढळून आले तर नजीकच्या रुग्णालयात थुंकी तपासणी किंवा एक्स-रे काढून घेणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांनाही टीबीच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
डॉ. मिलिंद गेजगे, प्रभारी क्षयरोग अधिकारी.