शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरची संख्या पोहोचली ७० वर...

By admin | Updated: February 11, 2016 00:31 IST

जिल्ह्यात टंचाई वाढली : पन्नास कोटीच्या नळपाणी योजनेचा शासनाकडे प्रस्ताव सादर

अंजर अथणीकर -- सांगलीजिल्ह्यामध्ये टंचाई वाढत असून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या ७० वर पोहोचली आहे. आणखी वीसहून अधिक टँकरसाठी मागणी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३०४ गावे व वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ५० कोटीच्या नळपाणी पुरवठ्याच्या १०४ योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची तीव्रता जाणवत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. गेले वर्षभर जिल्हा संपूर्ण टँकरमुक्त होता. यावर्षी मात्र आॅक्टोबरपासूनच टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सध्या ५७ गावे, ४५१ वाड्या-वस्त्यांवर एकूण ७० टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. टंचाईची झळ १ लाख ५५ हजार लोकसंख्येला बसली आहे. भाडेपट्ट्याने ६३, तर शासकीय ७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या दररोज १८३ खेपा करण्यात येत आहेत.योजनेचे प्रस्ताव : मार्चअखेर मंजुरी शक्य... जानेवारीपासून अनेक गावांतून नळपाणी योजनेसाठी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ३०४ गावे व वाड्यांमध्ये १०४ नळपाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यासाठी जवळपास ५० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सादर केला आहे. याला मार्चअखेरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ३२ कोटीच्या जूनअखेरपर्यंतच्या टंचाई आराखड्यास मंजुरी घेण्यात आली आहे. मंजुरीनंतर तात्काळ नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.