संख : येथील ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका जतहून संखकडे येताना कुलाळवस्तीजवळ पुढील चाकाचे टायर फुटून पलटी झाली. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुुुकसान झाले आहे. चालक प्रकाश जमदाडे यांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना रविवारी सायंकाळी ७.३०ला घडली.
संख प्राथमिक आरोग्य केंद्राची ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका (क्रमांक एमएच १४ सीएल १२३१) वळसंंग येथील रुग्णाला घेऊन जाण्यासाठी गेली होती. परंतु जायला वेळ लागला. त्यामुळे रुग्ण खासगी गाडीने निघून गेला.
ती परत संख प्राथमिक आरोग्य केंद्राकडे
चालक प्रकाश जमदाडे येऊन येत होते. संखपासून पाच किलोमीटरवर कुलाळवस्तीजवळ गाडीचे डाव्या बाजूचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला.
डाव्या बाजूला खड्ड्यात गाडी पलटी झाली. एक वेळा पलटी होऊन बांधाला तटून गाडी एका बाजूला कलली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चौकट
दुष्काळात तेरावा महिना : रुग्णांना त्रास
संख येथील रुग्णवाहिकेला दीड वर्षांपासून डॉक्टर नाही. डॉक्टरविना गाडी सुरू आहे. कोरोनाच्या संकटातसुद्धा डॉक्टर मिळाला नाही. तिची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाली असताना अपघातामुळे अडचणी
वाढल्या आहेत. याचा रुग्णांना त्रास होणार आहे.
फोटो ओळ : संख (ता. जत) येथील रुग्णवाहिका कुलाळवस्तीजवळ टायर फुटून पलटी झाली.