शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कदमांच्या दौऱ्याने एनएसयुआयला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 23:36 IST

काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न : आगामी निवडणुकांसाठी फिल्डिंग

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या कवठेमहांकाळ दौऱ्याने कवठेमहांकाळ ‘एनएसयुआय’ला बळ मिळाले असून एनएसयुआयचे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाले आहेत. काँग्रेस पक्ष बळकठीसाठी तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांनी तरुणांची फौज उभी करून विश्वजित कदम यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरु केला.तालुक्यात आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी नुकताच पक्षाकडे तरुणांचा ओढा वाढावा यासाठी दौरा केला. यावेळी त्यांनी कवठेमहांकाळ येथे एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना भेट देऊन पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना व अध्यक्ष विशाल शिंदे यांना ताकद देऊ, काम करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना न्याय देऊ, भविष्यात चांगली संधी देऊ, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.या तरुण कार्यकर्त्यांना आधार व ताकद, मार्गदर्शन देण्यासाठी विश्वजित कदम यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तसेच युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वैभव गुरव, विश्वजित यूथ फौंडेशनचे उदय शिंदे यांनीही या युवा कार्यकर्त्यांना मदत करावी व सहकार्य करावे, असे सांगितले आहे. गेल्या वर्षभरापासून एनएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थांच्या प्रश्नावर मोर्चे, आंदोलने करुन, निवेदने देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले यांनी, विशाल शिंदे यांना बरोबर घेऊन गाववार बैठका घेण्याचे नियोजन केले असून कदम यांच्या आदेशामुळे एनएसयुआयच्या नेतृत्वाला व कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडत तालुक्यात काँग्रेस पक्षवाढीसाठी कंबर कसली आहे. सोबतीला वैभव गुरव, उदय शिंदे यांनाही घेतले आहे.