शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपंचमीसाठी काय पण..!

By admin | Updated: October 19, 2016 23:53 IST

शिराळकरांचे असहकाराचे अस्त्र : बहिष्कारासोबत आता कर न भरण्याचा निर्णय

शिराळा : ‘नागपंचमीसाठी काय पण...’ असा नारा देत जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी यासाठी शिराळकर सरसावले आहेत. फटाकेमुक्त दीपावली साजरी करून त्यातून वाचलेले पैसे, वाढदिवस साजरा न करता त्याचे पैसे, दीपावलीतील किल्ला स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम नागपंचमी बचाव कृती समितीस न्यायालयीन लढ्यासाठी देण्याचे शिराळकरांनी मंगळवारी जाहीर केले. निवडणुकीवर बहिष्काराबरोबरच आता शासनाचे कर न देता असहकाराचे अस्त्र उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.नागपंचमीबाबत बचाव कृती समितीमार्फत येथील मरिमी चौकात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मंगळवारी शिराळा बंद ठेवण्यात आले होते. रात्री कृती समितीमार्फत न्यायालयीन लढाईबाबतची प्रगती, निवडणूक बहिष्कार व पुढील आंदोलनाची दिशा याबाबत नागरिकांची बैठक घेण्यात आली. विनायक गायकवाड यांनी माहिती दिली. त्यानंतर अ‍ॅड. प्रदीप जोशी, अ‍ॅड. नरेंद्र सूर्यवंशी यांनी न्यायालयीन कामकाजाची माहिती दिली.पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंग नाईक म्हणाले की, निवडणूक बहिष्काराचा निर्णय योग्य आहे. आता शासनाचे शेतसारा आदी कर न भरण्याबाबतही निर्णय घ्यावा. त्यास सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला. जि. प. सदस्या वैशाली नाईक, सुनंदा सोनटक्के, संगीता साळुंखे, रुपाली कदम, प्रतीक्षा निकम या महिलांनी, आपण सर्व महिलाही आंदोलनात उतरणार असल्याचे सांगितले.अजय जाधव, सम्राट शिंदे, संभाजीराव नलवडे, भीमराव गायकवाड, माजी जि. प. सदस्य महादेव कदम, जयसिंगराव शिंदे, प्रताप पाटील, बाबालाल मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले. न्यायालयीन लढ्याबरोबरच कायद्यात बदल करण्याच्यादृष्टीने कायदे मंडळाकडे प्रस्ताव पाठवणे, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे आदी निर्णय घेण्यात आले.रणजितसिंह नाईक, प्रमोद नाईक, अभिजित नाईक, केदार नलवडे, लालासाहेब शिंदे, संदीप पाटील, संतोष गायकवाड, विश्वास कदम, डी. जी. आत्तार, उत्तम निकम, गजानन सोनटक्के, देवेंद्र पाटील, वसंत कांबळे, संगीता खटावकर, सुनील कवठेकर, लालासाहेब तांबीट, प्रवीण शेटे उपस्थित होते. (वार्ताहर)न्यायालयात लढा : निधी संकलन सुरुबसवेश्वर शेटे, सत्यजित कदम यांनी वाढदिवस साजरा न करता अनुक्रमे १५ हजार व ११ हजार रुपये, तसेच केदार नलवडे यांनी ५१ हजार रुपये कृती समितीला देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.दीपावलीत फटाके न उडविता त्याचे पैसे कृती समितीला देण्याचे ठरले. यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हिंदवी स्वराज्य गु्रपमार्फत दरवर्षी किल्ला स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी त्यांनी स्पर्धा रद्द करुन, यातील बक्षिसाची रक्कम कृती समितीला देण्याचे जाहीर केले.अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांनी, आता फक्त ‘३२ शिराळा’ असे गावाचे नाव न लावता, प्रत्येकाने ‘नागपंचमीचे ३२ शिराळा’ असे नाव दुकानांच्या फलकांवर, व्हिजिटिंग कार्ड आदींवर लिहावे, असे सांगितले.निवडणूक बहिष्काराबरोबरच कोणताही शासकीय कर न भरता, असहकाराचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.