शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आता जप्तीचे अधिकार उपायुक्तांना

By admin | Updated: July 27, 2016 01:05 IST

स्थायी समितीत आज निर्णय : एलबीटीप्रश्नी व्यापाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

सांगली : एलबीटी कायद्यात व्यापाऱ्यांवरील कारवाईचे अधिकार आयुक्तांना आहेत. पण आता महापालिकेने आयुक्तांचे अधिकार उपायुक्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मिरजेत होणाऱ्या स्थायी समिती सभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवरील कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे. महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांनी एलबीटी कायद्यांतर्गत विवरणपत्रे दाखल केली आहेत. त्याची पडताळणी खासगी कर सल्लागारामार्फत सुरू आहे. आतापर्यंत २५० विवरणपत्रांची पडताळणी होऊन अंतिम देयके निश्चित करण्यात आली आहेत. विवरणपत्रांची पडताळणी करण्यासाठी आयुक्तांना कर सल्लागारासमोर समक्ष हजर राहावे लागते. प्रत्येकवेळी आयुक्तांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यासाठी आयुक्तांचे काही अधिकार उपायुक्त, एलबीटी अधीक्षक व एलबीटी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. एलबीटी कायद्यात कर भरण्याबाबत व्यापाऱ्याची बाजू ऐकून घेणे, त्याच्या व्यवसायाची तपासणी करणे, व्यापाऱ्याच्या मालकीची संपत्ती तात्पुरती जप्त करणे, ही कार्यवाही आयुक्तांनाच करावी लागते. आता हे अधिकार उपायुक्तांकडे हस्तांतरित केले जाणार आहे. त्याशिवाय व्यवसायाची नोंदणी, विवरणपत्र तपासणीच्या नोटिसीवर सह्या, विवरणपत्र मागणीच्या नोटिसा, निर्धारण आदेश देण्याचे अधिकार एलबीटी अधीक्षकांना, तर एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिका अधिनियम कलम १५२ अन्वये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल करण्याचे अधिकार एलबीटी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत. अधिकाराच्या हस्तांतरणामुळे एलबीटी वसुलीला गती येईल, असा प्रशासनाचा दावा आहे. (प्रतिनिधी)असे असतील अधिकार...उपायुक्तांना एलबीटीचे हप्ते बांधून देणे, व्यापाऱ्यांची बँक खाती, संपत्ती सील करण्याचे आदेश काढणे, या आदेशाची अंमलबजावणी करणे, सील केलेले बँक खाते उघडणे, दुकानांची तपासणी करणे, जप्तीचे अधिकार आदीबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार यामुळे प्राप्त होणार आहेत. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात कार्यवाही सुरूवात होईल.