शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रातील एटीएम सेंटर्सना घरपट्टीच्या नोटिसा

By admin | Updated: January 6, 2015 00:46 IST

माहिती संकलनानंतर भाडेकरारानुसार संबंधित एटीएमची घरपट्टी निश्चित केली जाणार आहे.

सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने आजवर दुर्लक्षित असलेल्या विविध बँकांच्या एटीएम सेंटर्सना आता लक्ष्य केले आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या एटीएम सेंटर्संची माहिती गोळा करतानाच प्रत्येक प्रभागातील संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत घरपट्टीच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. माहिती संकलनानंतर भाडेकरारानुसार संबंधित एटीएमची घरपट्टी निश्चित केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात सुमारे ९० एटीएम सेंटर्स असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात किती एटीएम आहेत, याची माहिती आता घरपट्टीच्या निमित्ताने घेतली जात आहे. आजवर बँकांच्या एटीएम सेंटर्सना घरपट्टी आकारलीच जात नव्हती. महापालिकेच्या सभागृहात याविषयी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. घरपट्टी विभागाने आता माहिती संकलनावेळीच संबंधित एटीएम सेंटर्सच्या जागा मालकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. संबंधित एटीएमला दिलेल्या जागेच्या भाड्याचे करारपत्र, संबंधित जागेची कागदपत्रे त्यांच्याकडून मागविण्यात आली आहेत. कागदोपत्री माहिती संकलन केल्यानंतर प्रत्यक्ष त्यांची घरपट्टी निश्चित केली जाणार आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने प्रथमच अशाप्रकारे एटीएमना घरपट्टीच्या कक्षात घेतले आहे. यापूर्वी घरपट्टी विभागाच्या दफ्तरी एटीएम केंद्रांची स्वतंत्र नोंदच नव्हती. अनेक जागामालकांनी केवळ गाळा भाड्याने दिल्याचे सांगून किंवा संबंधित जागा स्वत: वापरत असल्याचे सांगून घरपट्टी टाळली होती. बऱ्याच बँकांनी स्वत:च्या जागेत स्वतंत्र एटीएम केंद्र उभारून त्याविषयीची नोंद महापालिकेकडे केली नव्हती. अशा सर्व एटीएमना आता स्वतंत्र व्यावसायिक घरपट्टी लागू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)बीएसएनएलची वसुली उद्याबीएसएनएलकडील ४२ लाखांच्या घरपट्टी थकबाकीसाठी महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला. यासंदर्भात नोटिसाही बजावल्या होत्या. डिसेंबर महिन्यात कंपनीचे कार्यालय सील केले होते. त्यानंतर कंपनीने आठ दिवसांची मुदत मागवून घेतली होती. घरपट्टीपोटी पाठविलेल्या प्रस्तावाची प्रक्रिया दिल्लीहून पूर्ण होणार असल्याने कंपनीला आणखी मुदतवाढ दिली आहे. येत्या ७ जानेवारीस कंपनीकडून वसुली केली जाणार असल्याचे घरपट्टी अधिकाऱ्यांनी सांगितलेघरपट्टी वसुलीसाठी महापालिकेने ३५१ थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस बजावली आहे. येत्या आठवडाभरात आणखी साडेतीनशे नोटिसा बजावण्यात येणार आहेत. चालू आर्थिक वर्षातील मागणी आणि जुनी थकबाकी मिळून घरपट्टी विभागाला ५0 कोटी रुपयांची वसुली करायची आहे.