शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

दांडी देणाऱ्या चौदा अधिकाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: February 2, 2015 23:44 IST

महिन्यातून एक सभा होत असून महत्त्वपूर्ण निर्णय होतात, तरीही या सभेस अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहून सभागृहातील सदस्यांचा अवमान करीत असल्याची टीका सदस्यांनी केली.

सांगली : जिल्हा परिषदेत आज (सोमवारी) झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह चौदा विभागांच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली. या अधिकाऱ्यांना कारवाईबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली असून उत्तर आल्यानंतर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी दिली. दरम्यान, या सभेस दोन सभापती, चार सदस्यही गैरहजर राहिल्यामुळे दोन तास सभेचे कामकाज थांबविले होते. सभेचे कामकाज सुरू झाले. पण, अर्ध्या तासातच ते गुंडाळण्यात आले.जलव्यवस्थापन समिती सभेची नोटीस आठ दिवस आधी सर्वच विभाग, सदस्य, अधिकारी, सभापतींना देण्यात येते. महिन्यातून एक सभा होत असून महत्त्वपूर्ण निर्णय होतात, तरीही या सभेस अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहून सभागृहातील सदस्यांचा अवमान करीत असल्याची टीका सदस्यांनी केली. निम्म्यापेक्षा जास्त अधिकारी गैरहजर होते. कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील, समाजकल्याण सभापती उज्ज्वला लांडगे, सदस्या सुवर्णा पिंगळे, सुनंदा पाटील, स्वीकृत आबासाहेब पाटील, गणपती सगरे आदींनी सभेला दांडी दिल्यामुळे, दोन तास जलव्यवस्थापन समितीचे कामकाज बंद ठेवण्यात आले. अन्य काही सदस्यांनी हजेरी लावल्यामुळे सभा सुरू झाली. पण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लघु सिंचन जलसंधारण, ग्रामीण पाणी पुरवठा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दोन्ही कार्यकारी अभियंता, आटपाडी, शिराळा, खानापूर, जत, कवठेमहांकाळ, मिरज आदी पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी चौदा विभागांचे अधिकारी गैरहजर होते. सभेला जवळपास ६० टक्के अधिकारी गैरहजर होते. यामुळे सभेत कोणताही ठोस निर्णय न होताच केवळ अर्ध्या तासामध्ये सभा गुंडाळण्यात आली.सदस्यांच्या भावनांचा उद्रेक लक्षात घेऊन अध्यक्ष होर्तीकर, उपाध्यक्ष पाटील यांनी सर्व गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याची सूचना दिली. नोटिसांना खुलासा आल्यानंतर चौदा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)