शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा कारखान्याला नोटीस

By admin | Updated: February 24, 2016 00:47 IST

२२ कोटी तातडीने भरा : विनापरवाना हंगाम; साखर आयुक्तांची कारवाई

सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याने दोन वर्षांतील उसाची बिले थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हंगाम सुरू ठेवल्याने साखर आयुक्तांनी २२ कोटींच्या दंडाची नोटीस सोमवारी कारखान्याला पाठविली. त्यानंतर लगेचच मंगळवारी दुसरी नोटीस बजावून दंड तत्काळ भरला नाही, तर जप्तीची कारवाई करण्यात येईल, अशा इशारा दिला आहे.वसंतदादा कारखान्याने २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन वर्षांतील ऊस गाळपाचे पंधरा कोटींचे बिल शेतकऱ्यांना दिलेले नाही, या कारणावरून साखर आयुक्तांनी २०१५-१६ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी गाळप परवाना दिला नव्हता. शासनाने परवाना दिला नसतानाही, कारखाना प्रशासनाने गळीत हंगाम सुरू केला आहे. कारखान्याने आतापर्यंत ५ लाख २१ हजार ६० टन उसाचे गाळप करून ५ लाख ४८ हजार ५०० क्विंटल साखर तयार केली आहे. याप्रश्नी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्त कार्यालयात सुनावणी होऊन, विनापरवाना कारखाना सुरू ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी सोमवारी वसंतदादा कारखाना प्रशासनाला २२ कोटींच्या दंडाची नोटीस बजावली होती. मंगळवारी साखर आयुक्तांनी पुन्हा दुसरी नोटीस बजावून, २२ कोटी दंडाची रक्कम भरावी, अन्यथा कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. नोटिसीमुळे कारखाना प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान, यंदाच्या हंगामामधील दि. १ डिसेंबर ते २२ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या ऊस गाळपाची बिले मिळालेली नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांची या गळीत हंगामातीलही कोट्यवधीची थकबाकी कारखान्याकडेआहे. त्यामुळे या थकबाकीप्रश्नीही कारखान्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)जप्तीची कारवाई पूर्ण कधी होणार?वसंतदादा कारखान्याने शेतकऱ्यांना थकीत बिलाची रक्कम दिली नसल्याने शेतकरी संघटनेने दोन वर्षांपूर्वी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मिरजेच्या तहसीलदारांनी कारखान्याच्या साखर गोदामास टाळे ठोकून जप्तीची कारवाई केली होती. जप्त साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकबाकी भागविली असती, तर सध्या कारखान्यासमोर अडचणी निर्माण झाल्या नसत्या, असा संचालक मंडळाचा दावा आहे. जप्तीच्या कारवाईमुळे जमीन विक्रीही थांबली असून, कारखान्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे.