शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

महापालिकेची वीज कंपनीला नोटीस

By admin | Updated: August 26, 2015 23:00 IST

दोन कोटी बत्तीस लाख द्या : ट्रान्स्फॉर्मरसाठी दिलेल्या भूखंडांबाबत आज बैठक; महापौर आक्रमक

सांगली : महापालिका हद्दीतील चार मोक्याचे भूखंड वीज वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. या जागांपोटी दोन कोटी ३२ लाख रुपये महापालिकेने द्यावेत, अन्यथा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याची नोटीस बुधवारी बजाविण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी महापौरांच्या दालनात वीज महावितरण अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. वीज मंडळाकडून महापालिकेला कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने, महापौर विवेक कांबळे यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी पाच वर्षापूर्वी महाआघाडीच्या काळात चार भूखंड वीज कंपनीला देण्यात आले. त्याबदल्यात वीज कंपनीने सांगली व मिरज शहरातील रस्ता रुंदीकरणातील खांब हस्तांतरण करून द्यावयाचे होते. या कामात वीज मंडळाकडून मोठी दिरंगाई झाली आहे. केवळ सांगलीतील दत्त-मारुती रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित तीन रस्त्यांवरील खांब हस्तांतरणाचे काम अपूर्ण आहे. महापालिकेने वारंवार वीज कंपनीशी संपर्क साधला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शहरात खांब, ट्रान्स्फॉर्मर बसविताना महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. पण आजअखेर वीज कंपनीने ना हरकत न घेताच खांब उभे केले आहेत. विशेषत: गुंठेवारी भागात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब उभे केले आहेत. अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले असून ते अडचणीचे ठरत आहेत. या प्रश्नांवर महापौर विवेक कांबळे यांनी बुधवारी मालमत्ता व्यवस्थापक रमेश वाघमारे, विद्युत विभागाचे प्रमुख अमर चव्हाण यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर वीज कंपनीला दिलेल्या भूखंडांची शासकीय दरानुसार होणारी दोन कोटी ३२ लाख रुपये रक्कम महापालिकेकडे भरण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच गुरुवारी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठकही महापौरांच्या दालनात बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत वीज अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)खांब हस्तांतरणाचे कामपंचमुखी मारुती रोड - १५.५० लाखमिरज शिवाजी रोड - ३८ लाखदत्त-मारुती रोड - ११ लाखदत्तनगर - ७.८१ लाखएकूण - ७१.८१ लाखदादागिरी सहन करणार नाही : महापौरवीज महावितरणकडून महापालिकेला कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यांची दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा महापौर विवेक कांबळे यांनी दिला. ते म्हणाले की, महापालिकेची जागा फुकटात वापरायची आणि नागरिकांकडून विजेवर पैसे कमवायचे, हा धंदा सुरू आहे. एकाही खांबाला महापालिकेची नाहरकत घेतलेली नाही. आम्ही मात्र त्यांना नेहमीच सहकार्याची भूमिका घ्यायची, हा कुठला न्याय? घर मालकाचे आणि रुबाब भाडेकरूंचा, असा प्रकार वीज कंपनीकडून सुरू आहे. कंपनीने महापालिकेचे पैसे दिले नाहीत, तर या जागा ताब्यात घेतल्या जातील. त्यासाठी प्रसंगी कायदेशीर लढाईचीही तयारी आहे. महापालिकेने दिलेल्या जागा व त्यांची किंमतठिकाणक्षेत्रफळकिंमत१. कोल्हापूर रोड ८६३ चौ.मी.९१ लाख ६५ हजार२. टिंबर एरिया२००० चौ.मी.५० लाख३. कुपवाड४५३९ चौ.मी. ७.९८ लाख४. शाळा क्र. २२ १३७५ चौ.मी.८३.०५ लाख