शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

राज्यपाल नियुक्त सदस्यप्रकरणी केंद्र सरकारला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

सांगली : राज्यपाल नियुक्त सदस्यप्रकरणी कायद्यातील मूळ तरतुदींचा भंग होत असल्याप्रकरणी याचिकेस दखलपात्र ठरवत उच्च न्यायालयाने याप्रकरणी म्हणणे मांडण्यास ...

सांगली : राज्यपाल नियुक्त सदस्यप्रकरणी कायद्यातील मूळ तरतुदींचा भंग होत असल्याप्रकरणी याचिकेस दखलपात्र ठरवत उच्च न्यायालयाने याप्रकरणी म्हणणे मांडण्यास केंद्र सरकारच्या ॲटर्नी जनरलना आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती आर. डी. धानुका व माधव जामदार यांच्या खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले. या याचिकांद्वारे सदस्य नियुक्तीत मंत्रिमंडळ आणि राज्यपालांच्या अमर्याद अधिकारांनाच आव्हान दिले असून, त्यावर आता केंद्र सरकारला स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. याचिकाकर्ते दिलीप आगळे (लातूर) आणि शिवाजी पाटील (सांगली) यांनी स्वतंत्रपणे याचिका दाखल केल्याने राज्य सरकारने १२ व्यक्तींच्या नियुक्‍त्या करण्याबाबत राज्यपालांना केलेली शिफारस आता न्यायालयीन वादात अडकली आहे. संविधानातील कलम १७१ (३)(इ) मधील तरतुदीनुसार कला, विज्ञान, साहित्य, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांतील जाणकारांना विधान परिषेदवर नियुक्तीचे अधिकार राज्यपालांना आहेत. मात्र, आजवर या नियुक्त्या राजकीय हेतूने केल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयास निदर्शनास आणून दिले. पराभूत झालेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करण्यासाठी किंवा मर्जीतील राजकीय व्यक्तींच्या नेमणुका करण्यासाठी या तरतुदीचा गैरवापर होऊ नये व खिरापतीसारख्या नियुक्त्या वाटल्या जाऊ नयेत, यासाठी ही याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांनी स्वतःची नियुक्ती विधान परिषदेवर व्हावी, यासाठीही राज्य सरकार व राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविले होते. या दोन्ही याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाहीत, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे महाअभिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकेतील मुद्यांचे घटनात्मक महत्त्व लक्षात घेत त्या विचारार्थ घेण्यास योग्य असल्याचे प्राथमिक मत नोंदविले आणि केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल यांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली.

कोट

उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यपाल नियुक्त सदस्य नोंदणीबाबत राज्य आणि केंद्र सरकारला आता स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. तसेच योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी राज्यपालांवर घटनात्मक बंधन घालतानाच त्यांच्या अधिकारांच्या मर्यादाबाबतही स्पष्टता येईल.

- शिवाजी पाटील, याचिकाकर्ते, सांगली