शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

पशुवैद्यकीय दवाखाने नव्हे, तर जनावरांचे कोंडवाडे?

By admin | Updated: June 3, 2015 01:06 IST

दयनीय अवस्था : जुन्या, गळक्या इमारतींमधून कारभार; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

गजानन पाटील- संख -ग्रामपंचायती, पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षाने जत तालुक्यातील ५ दवाखान्यांची दुरवस्था निर्माण झाली आहे. दवाखाना सुरू होऊन वीस वर्षांचा कालावधी होऊनसुद्धा तिकोंडी, उमराणी येथील दवाखाने आजही खासगी इमारतीत सुरू आहेत. एकाच खोलीमध्ये दवाखाने सुरू असल्याने त्यांना कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर जत, बोर्गी, सोन्याळ येथे ५० वर्षांपासून जुन्या गळक्या इमारतीत कारभार सुरू आहे. खिलारी व माडग्याळ मेंढीसाठी प्रसिद्ध असलेला जत तालुका आहे. जत, सोन्याळ, बोर्गी, आवंढी हे दवाखाने सर्वात जुने आहेत. आवंढी येथील दवाखान्याची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. जत, सोन्याळ, बोर्गी या दवाखान्यांचा कारभार आजही जुन्या इमारतीत सुरू आहे. जत येथील इमारत ही १९५० पूर्वीची आहे. श्रेणी-१ च्या दवाखान्याअंतर्गत शहराजवळील गावांचा समावेश आहे. पावसाळ्यात ही इमारत गळते. पुढच्या छाताचा गिलावा पडला आहे. पशुपालकांना स्वच्छतागृह, शौचालय, पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. पशुसंवर्धन विभागाने सध्या नवीन सुसज्ज दवाखाना बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सुसज्ज दवाखाना उभारला जाणार आहे.सोन्याळ दवाखान्याची इमारत १९५० पूर्वीची आहे. जाडरबोबलाद रस्त्याच्या दोन्ही बाजूला दवाखाना व डॉक्टर निवास अशा दोन इमारती आहेत. दवाखान्यासाठी चार खोल्या आहेत. त्यापैकी १ खोली सुस्थितीत आहे. बाकीच्या तीन खोल्या नादुरुस्त आहेत. त्या खोल्यांमध्ये दवाखान्याचे साहित्य आहे. उंदीर, घुशी, साप यांची वस्तीस्थाने आहेत. डॉक्टर निवासासाठी दुसरी सिमेंट पत्र्याची इमारत आहे. इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे ८ वर्षांपासून येथे कोणीही रहात नाही. दवाखान्यासाठी जादा जागा नसल्यामुळे याच इमारतीचे निर्लेखन करून सुसज्ज दवाखाना बांधला जाणार आहे. बोर्गी येथे श्रेणी-१ चा सर्वात जुना दवाखाना आहे. इमारतीचे निर्लेखन करण्यात आले आहे. प्रारूप आराखडा करून इमारतीची दुरुस्ती केली जाणार आहे. कंपाऊंडचे बांधकाम सुरू आहे.तिकोंडीत गेल्या २० वर्षांपासून खासगी इमारतीमध्ये दवाखाना सुरू आहे. पत्र्याची एक खोली आहे. तिथेच औषधे, रजिस्टर, इतर साहित्य ठेवले आहे. ना डॉक्टर, ना कर्मचाऱ्यांचे निवासस्थान. सुसज्ज दवाखान्यासाठी ग्रामपंचायतीने जागा दिली नाही. उमराणी येथील दवाखानाही खासगी जागेतच सुरू आहे. दवाखाना बांधला होता. दवाखाना जागेचा कोर्ट मॅटर झाला आहे. तो वाद संपला असून, जागा उपलब्ध झाली आहे.