शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय हरित न्यायालयाची महापालिकेला नोटीस

By admin | Updated: July 10, 2014 00:42 IST

वृक्षतोड प्रकरण : सांगली जिल्हा सुधार समितीची याचिका; न्यायालयीन सुनावणीला हजर राहण्याची सूचना

सांगली : शहरातील पुष्पराज चौक ते विश्रामबागपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणांतर्गत झालेल्या वृक्षतोडप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या पुणे खंडपीठाने सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस नोटीस बजावली आहे. उद्या (गुरुवारी) होणाऱ्या सुनावणीस हजर राहण्याचीही सूचना न्यायालयाने केली आहे. न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर व डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. सांगली जिल्हा सुधार समितीने या रस्ता रुंदीकरणांतर्गत होणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात चिपको आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला समितीने ही वृक्षतोड बेकायदेशीर असल्याचे निवेदन दिले होते. समितीतील रवींद्र महादेव चव्हाण यांनी या रस्त्याचा अभ्यास करून वृक्षतोडीशिवाय रुंदीकरणाचा स्वतंत्र आराखडा तयार केला. महापालिका आयुक्तांकडेही तो देण्यात आला. या आराखड्यानुसार रुंदीकरणाचे काम शक्य असल्याने वृक्षतोड करू नये, अशी मागणी केली. पुष्पराज चौकापासून होणाऱ्या या रुंदीकरणाच्या कामासाठी सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. रुंदीकरणांतर्गत काही झाडे हटविण्यात आली होती. सुधार समितीचे चव्हाण यांनी याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायालयाच्या पुणे खंडपीठात धाव घेतली. रस्ता रुंदीकरण व वृक्षतोडीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग या कामात झाला असल्याचा मुद्दाही त्यांनी याचिकेत मांडला आहे. हरित न्यायालयाने याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिरजेतील कार्यकारी अभियंता आणि सुप्रिम कंपनीस नोटीस बजावली आहे. याचिकेसंदर्भातील म्हणणे मांडण्यासाठी त्यांना गुरुवारी होणाऱ्या सुनावणीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांनी केली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या याचिकाकर्त्या समितीतर्फे अ‍ॅड. असिम सरोदे काम पहात आहेत. (प्रतिनिधी)