शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

रस्ता रुंदीकरणात येणारी झाडे तोडण्यास मनाई

By admin | Updated: June 27, 2014 00:42 IST

महापालिकेला दणका : न्यायालयाचा निर्णय

सांगली : सांगली-मिरज मार्गावरील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या रुंदीकरणातील १२४ झाडे तोडण्यास आज, गुरुवारी जिल्हा न्यायालयाने ७ जुलैपर्यंत मनाई केली. यासंदर्भात विकास मगदूम यांच्यावतीने अ‍ॅड. अमित शिंदे व अ‍ॅड. दीपक हेगडे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. म्हणणे मांडण्यास मुदत देण्याची महापालिकेची मागणीही न्यायालयाने फेटाळली. शहरातील पुष्पराज चौक ते विश्रामबाग या हिरव्या गर्द झाडांनी नटलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणावरून बरेच वादंग निर्माण झाले आहे. या रस्त्यावरील सुमारे सव्वाशे झाडे रुंदीकरणात नष्ट होणार आहेत. जिल्हा सुधार समितीने वृक्षतोडीविरोधात आंदोलन हाती घेत विरोध केला होता. त्यासाठी चिपको आंदोलनही केले. शिवाय वृक्षतोडीविना रुंदीकरणाचा प्रस्तावही सादर केला होता. त्यानंतर महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत काही अटींवर वृक्षतोडीस मंजुरी देण्यात आली. या झाडांच्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराने रस्त्याच्या दुतर्फा ६०० झाडे लावण्याची अट घातली आहे. वृक्षतोडीविरोधात विकास मगदूम यांच्यावतीने काल, बुधवारी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. आर. नावंधर यांच्या न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही. महापालिकेने वृक्षतोडीस परवानगी देताना बेकायदेशीर प्रक्रिया राबविली आहे. वृक्षतोडीशिवाय रुंदीकरणाचा प्रस्ताव आयुक्तांना दिला होता; पण त्याची दखल न घेता कायदा धाब्यावर बसवून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केली.या याचिकेवर आज सुनावणी झाली. महापालिकेचे वकील अरविंद देशमुख यांनी, म्हणणे मांडण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती केली. मगदूम यांच्यावतीने अ‍ॅड. अमित शिंदे यांनी म्हणणे मांडले. पालिकेने ११ जूनला वृक्षतोडीस मान्यता दिली आहे. त्यानंतर १५ दिवसांत प्रत्यक्ष वृक्षतोड करता येते. त्यामुळे आज अथवा उद्या झाडे तोडली जाऊ शकतात. एकदा झाडे तोडल्यानंतर याचिकेला अर्थच उरणार नाही, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीश नावंधर यांनी ७ जुलैपर्यंत वृक्षतोडीला मनाई केली. (प्रतिनिधी)