शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शब्दात कितीही गोडवा असला तरी, त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:03 IST

सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची ...

सांगली : शब्दांना काही अर्थ असतो का? कारण शब्दकोशातही देण्यात आलेले शब्दांचे अर्थ खूपच सीमित स्वरूपाचे असतात, असे भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते. त्यामुळे शब्द कितीही गोड असले तरी त्यामागची भावना तितकीच महत्त्वाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.भवाळकर म्हणाल्या, भाषेतील गोडवा व भावनेतील गोडवा महत्त्वाचा ठरत असतो. कारण केवळ शब्दांना अर्थ कधीच नसतो, तर तो तुम्ही उच्चारता कसे हे महत्त्वाचे असते. शब्दकोशातही त्याचे अर्थ खूपच सीमित स्वरूपात असल्याचे एक भाषाशास्त्राची अभ्यासक म्हणून नेहमीच वाटते.भाषेतील गोडवाच अनुभवायचा झाल्यास शब्दातील उच्चारावरही लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. भाषेतील हेलकावे, आरोह, अवरोह, स्वराघात, बलाघात म्हणजेच कोणत्या शब्दावर तुम्ही जोर देऊन बोलता, यावरही ते अवलंबून असते. उदाहरणच द्यायचे झाले तर शब्दकोशात शहाणा या शब्दाचा वाईट अर्थ आहे, असे कुणी म्हणेल का? पण एखादा जरा जास्तच बोलायला लागला, तर दुसरा लगेच त्याला फार शहाणे आहात, असे म्हणतो.म्हणजेच त्याला मूर्खच म्हणायचे असते. त्यामुळे शब्द जरी सकारात्मक वापरला तरी, त्याचे उच्चारणे खूप काही सांगून जाते. खेकसून बोलणे, हळुवार, सावकाश, टोमणे मारत बोलणे यातून हेच दिसून येते. आवाजात जरी कितीही मृदुपणा असला तरी, शब्दातील लागटपणा लगेच समोरच्या व्यक्तीला कळतो. त्यामुळे भाषेचे, शब्दांचे प्रक्षेपण व त्याच्या संदर्भातून तुम्ही किती गोड, सकारात्मक बोलता, हे दिसून येते.माणसे जोडण्याची, हृदये जोडण्याची प्रक्रिया ही चांगल्यारितीने होण्यासाठी आपले गोड शब्दच कारणीभूत ठरतात. आवाजातील पट्टी महत्त्वाची असते. अनेकजण साधे बोलले तरी खेकसत असल्यासारखे बोलतात.आपण किती माणसांशी संवाद साधतो व त्यावेळी आपले शब्द किती प्रभावी आहेत, यावरही लक्ष दिले गेले पाहिजे. दोन माणसांच्या समोर असणाऱ्या आवाजाची पट्टी व एखाद्या सभेतील पट्टी यात बदल हवाच व शब्दातील बदलही तितकाच प्रभावी असेल, तरच गोडी निर्माण होते.