शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

महापालिकेला मिळणार मद्यातून पाच कोटी

By admin | Updated: August 29, 2016 23:14 IST

एलबीटी लागू : २०० दुकानदारांकडून होणार वसुली; १५ आॅगस्टपासून अंमलबजावणी

सांगली : राज्य शासनाने मद्य व मद्यार्क यापासून बनविलेल्या उत्पादनाच्या विक्रीवर आता स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी १५ आॅगस्टपासून करण्याचे आदेश सोमवारी सांगली महापालिकेला प्राप्त झाले. त्यामुळे वर्षाकाठी महापालिकेला मद्यातून पाच कोटींचा महसूल मिळणार आहे. महापालिका क्षेत्रातील ५० कोटी रुपयापेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना मद्य व मद्यार्क यापासून बनविलेल्या उत्पादनाच्या विक्रीवर आता स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरावा लागणार आहे. शासनाने यापूर्वी ठरवून दिलेल्या दरानुसार एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. २ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. आता १५ आॅगस्टपासून मद्य व मद्यार्क उत्पादनावरील एलबीटी वसुली सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसा आदेश आजच सांगली महापालिकेला प्राप्त झाला. सांगलीत सुमारे २२ हजार व्यापारी आहेत. त्यापैकी ११ हजार व्यापारी एलबीटीला पात्र होते. एलबीटी रद्द झाल्याने या अकरा हजार व्यापाऱ्यांना लाभ झाला आहे. ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेले केवळ २५ नोंदणीकृत व्यापारी आहेत. त्यापैकी १० ते १५ व्यापारीच एलबीटीला पात्र आहेत. त्यांच्याकडून वर्षाला ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यात महापालिका हद्दीत होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारावर एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभार लावून ही रक्कम महापालिकांना उपलब्ध करुन दिली जात आहे. आता त्यात मद्य व मद्यार्क उत्पादन करणाऱ्या १९६ व्यापाऱ्यांची भर पडली आहे. शासनाच्या नव्या आदेशामुळे या व्यापाऱ्यांना १५ आॅगस्टपासूनचा एलबीटी भरावा लागणार आहे. शासनाने एलबीटीचे दर पूर्वीच निश्चित केलेले असून, मद्य व मद्यार्क यापासून बनविलेल्या उत्पादनावर ८ टक्के दराने आकारणी केली जात होती. आताही याच दराने एलबीटी आकारणी होणार आहे. त्यातून साधारणपणे दरवर्षी ५ कोटी रुपयांचा एलबीटी मनपाला मिळणार आहे. या उत्पन्नामुळे महापालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)'अनुदानातून कपात?एलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य शासनाकडून महापालिकेला दरमहा १०.२५ कोटी रुपये अनुदानापोटी दिले जातात. त्यातून महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन व दैनंदिन खर्चाची तरतूद होत आहे. विकास कामांना मात्र पालिकेला शासनाच्या अनुदानावरच अवलंबून राहावे लागत आहे. वित्त आयोगाच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी पालिकेला मिळत आहे. त्यात उत्पन्नाचे स्रोत असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता कराच्या वसुलीचा धडाका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी लावला आहे. गेल्या महिन्याभरात सात ते आठ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. आता मद्यापासूनही महापालिकेला वर्षाला ५ कोटीचे उत्पन्न मिळेल. सध्या तरी हे अतिरिक्त उत्पन्नच पालिकेच्या तिजोरीत जमा होईल. भविष्यात शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून ही रक्कम वजा होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.