शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदावरून काँग्रेसमध्ये निरंजन आवटींची बंडखोरी

By admin | Updated: February 3, 2016 00:34 IST

हारुण शिकलगार यांना उमेदवारी : उपमहापौरपद वंचित गटाला देण्याचा काँग्रेसचा निर्णय; आवटी गट आक्रमक

सांगली : महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीवरून काँग्रेसअंतर्गत गटबाजी मंगळवारी उफाळून आली. महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक हारुण शिकलगार व उपमहापौरपदासाठी विजय घाडगे यांच्या नावाची घोषणा होताच नगरसेवक सुरेश आवटी गट आक्रमक झाला. या गटानेही महापौरपदासाठी निरंजन आवटी व उपमहापौरपदासाठी प्रदीप पाटील यांचा अर्ज दाखल करीत बंडखोरी केली. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्यादिवशी सहाजणांनी सात अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी काँग्रेसमधून हारुण शिकलगार, बंडखोर निरंजन आवटी, राष्ट्रवादीतून विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, स्वाभिमानी आघाडीतून स्वरदा केळकर यांनी, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसमधून विजय घाडगे, प्रदीप पाटील, राष्ट्रवादीतून राजू गवळी, संगीता हारगे, ‘स्वाभिमानी’तून स्वरदा केळकर, संगीता खोत यांनी अर्ज दाखल केले आहे. शनिवारी (६ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता महापौर निवडीची सभा होत आहे. महापौर निवडीवरून सत्ताधारी कॉँग्रेसमध्ये सुरुवातीपासून फाटाफूट झाली होती. एका गटाने नावाची शिफारस करण्यासाठी पैशाचा बाजार मांडला होता. दहा ते बारा नगरसेवकांच्या या गटाने नेत्यांवर दबाव वाढवला होता. या गटाच्या हालचाली पाहून सुरेश आवटी गटाने मोर्चेबांधणी केली होती. रविवारी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत महापौर, उपमहापौर निवडीचे सर्वाधिकार जयश्रीताई मदन पाटील यांना देण्यात आले. मंगळवारी सकाळपासून इच्छुकांनी ‘विजय’ बंगल्यावर पुन्हा शक्तिप्रदर्शन केले. दुपारी एकनंतर आमदार पतंगराव कदम यांच्या बंगल्यात पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सहाही इच्छुकांच्या पुन्हा मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर हारुण शिकलगार व सुरेश आवटी ही दोन नावे पुढे आली. दोघांनाही एकत्रित बसवून एकमत करण्याचा प्रयत्न झाला, पण अखेरपर्यंत त्यांच्यात एकमत झाले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अर्धा तास शिल्लक असताना शिकलगार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, तर काँग्रेसमधील वंचित गटाला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी वंचित गटाच्या नगरसेवकांशी चर्चा करीत विजय घाडगे यांचा अर्ज भरण्याची सूचना नेत्यांनी केल्याचे स्पष्ट केले. मुदत संपण्यास पंधरा मिनिटे शिल्लक असताना काँग्रेसकडून शिकलगार व घाडगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तोपर्यंत आवटी गटानेही अर्ज भरण्याची तयारी केली. अवघ्या पाच मिनिटात आवटी गटाकडून निरंजन आवटी यांनी महापौरपदासाठी, तर प्रदीप पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. पक्षाने व्हीप बजावला असतानाही त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी सूचक, अनुमोदक म्हणून सह्या केल्या. काँग्रेसमध्ये अचानक झालेल्या या बंडखोरीमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. (प्रतिनिधी) दहा महिन्यांचा कालावधी दोन्ही पदांसाठी दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पुढील अडीच वर्षांत तीन महापौर व उपमहापौर केले जाणार असल्याचे काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील व गटनेते किशोर जामदार यांनी स्पष्ट केले. या पदासाठी काँग्रेसमधून सहाजण इच्छुक होते. त्यापैकी एकाला उपमहापौरपद देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी सुरेश आवटी, राजेश नाईक यांची संभाव्य महापौर म्हणून चर्चा सुरू होती. काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकमताने उमेदवार निश्चित केला आहे. दहा महिन्यांनंतर दोन्ही पदाधिकारी राजीनामे देतील. सुरेश आवटी व त्यांच्या समर्थक नगरसेवकांची समजूत काढू. शिवाय इतर पक्षांतील नेत्यांशीही चर्चा करणार आहोत. - जयश्रीताई पाटील, काँग्रेस नेत्या