शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

पोलिसांच्या समर्थनार्थ निफाडला स्वाक्षरी मोहीम

By admin | Updated: September 22, 2016 22:56 IST

पोलिसांच्या समर्थनार्थ निफाडला स्वाक्षरी मोहीम

सांगली : मराठा समाजाने आरक्षणासह अन्य प्रश्नांवर दि. २७ सप्टेंबर रोजी क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चास दलित महासंघाचा पाठिंबा आहे, अशी माहिती दलित महासंघाचे नेते प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाच्या अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा नाही, असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक झाली. या बैठकीस महासंघाचे कार्याध्यक्ष उत्तम चांदणे, सरचिटणीस शेखर महापुरे, जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, शहाजी मोरे, सुनील वारे उपस्थित होते. बैठकीत मराठा समाजाच्या क्रांती मोर्चास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यास आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रश्नावर लोकशाही मार्गाने ते मोर्चा काढत आहेत. यास विरोध करण्याचा प्रश्नच नाही. कोपर्डी येथील घटना घडल्यानंतर प्रथम निषेध आम्हीच केला होता. यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. (वार्ताहर)मिरज : मागासवर्गीय सेलतर्फे प्रदेश उपाध्यक्ष व मिरजेचे काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी मराठा मोर्चास पाठिंबा जाहीर केला. मराठा व दलित समाजात फूट पाडण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मागासवर्गीय समाज मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी सांगितले. मराठा मोर्चाचे श्रीरंग पाटील यांना पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. जि. प. सदस्य प्रकाश कांबळे, मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद दाभाडे, सुहास सावर्डेकर, मधुकर बामणीकर, अशोक रजपूत, सुधीर कांबळे, विकास वाघमारे, हैदर शेख, मनोज मोहिते, श्रीधर शिंगे यावेळी उपस्थित होते. सुभाषनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. पी. कोकाटे, उपाध्यक्ष एस. पी. महाजन यांनी मराठा मोर्चास पाठिंबा जाहीर केला. जिल्हा प्रवासी वाहतूक अ‍ॅपे रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, जय भारत आॅटोरिक्षा संघटना व मिरज रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे सचिन चौगुले, अजमुद्दीन खतीब, रफिक शेख यांनी मराठा मोर्चास पाठिंबा जाहीर केला. मराठा सेवा संघाचे रमेश पवार, विलास देसाई यांना रिक्षाचालकांनी पाठिंब्याचे निवेदन दिले. याव्ेळी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)तीन हजार युवक मांजर्डेतून जाणारमांजर्डे : मराठा मोर्चासाठी मांजर्डे (ता. तासगाव) येथून तीन हजाराहून अधिक नागरिक सहभागी होण्याचा निर्धार बैठकीमध्ये करण्यात आला. अ‍ॅड. कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत येथे हनुमान मंदिरासमोर नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी, मराठा समाजाची सर्व क्षेत्रामध्ये गळचेपी चालली असल्याचे सांगून, कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना शिक्षा द्यावी, तसेच अ‍ॅट्रॉसिटीबाबत बदल, मराठा समाजाला आरक्षण, शिवाजी महाराजांचे स्मारक, मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील यांच्या नावे महामंडळाची स्थापना आदी मागण्या केल्या. यावेळी कोळी, मुस्लिम, माळी, रामोशी समाजाने मोर्चाला पाठिंबा दर्शविला.मराठा क्रांती मोर्चा कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. गावातील सर्व वाहनधारकांनी २७ रोजीच्या मोर्चासाठी मोफत वाहने देण्याचे जाहीर केले. (वार्ताहर)