शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नवअभियंत्यांनो, शहराच्या समस्यांची उत्तरे शोधा

By admin | Updated: May 26, 2017 23:07 IST

नवअभियंत्यांनो, शहराच्या समस्यांची उत्तरे शोधा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे स्थलांतर वाढले आहे. शहरांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यात शहराच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने या समस्या बिकट होत आहेत. त्यामुळे नव्या अभियंत्यांसमोर शहरातील समस्यांची उत्तरे शोधण्याचे आव्हान असल्याचे मत वालचंद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी शुक्रवारी केले.येथील वालचंद महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर एमटीईचे नूतन अध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, प्राचार्य जी. व्ही. परीशवाड उपस्थित होते. अजित गुलाबचंद म्हणाले की, जगाच्या रचनेत वेगाने बदल घडत आहेत. आजच्याइतके समृध्द आणि अस्थिर वातावरण कधीच नव्हते. त्यामुळे नवअभियंत्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी विस्तीर्ण आकाश खुले आहे. भविष्याचा वेध घेतल्यास दहा वर्षाच्या कालावधित लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. मात्र जो गुणवत्ता दाखवेल त्याचाच निभाव लागेल, अशी स्थिती असेल. खेड्यातून शहराकडे येणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खेड्यांच्या नयनरम्य कल्पनेत रममाण झाल्यामुळे शहराच्या विकासाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. नवअभियंत्यांसमोर शहराच्या विकासाचे आव्हान आहे, ते त्यांनी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलले पाहिजे, असे ते म्हणाले.देवानंद शिंदे म्हणाले की, एक जबाबदार अभियंता म्हणून प्रत्येकाने आपली ओळख निर्माण करावी. कल्पकतेला संधी देऊन नवनवीन उपक्रम राबविण्यास पुढाकार घेतला, तर ती देशसेवाच ठरणार आहे. जीवनात यश, अपयशाचे डोंगर नेहमीच सर करावे लागतात. तुमचे कौशल्य दाखविण्यासाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध असून, त्याचा अभियंत्यांनी संधी म्हणून लाभ घेणे आवश्यक आहे. संजयकाका पाटील म्हणाले की, ‘वालचंद’ने अनेक वर्षांपासून उत्तम विद्यार्थी घडविण्याची परंपरा जपली आहे. त्यामध्ये यापुढेही खंड पडणार नाही. नेहमी उत्तम कार्य करण्याचीच दृष्टी ठेवल्यास राष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल होण्यास वेळ लागणार नाही, असे सांगितले. यावेळी वालंचदच्या माजी विद्यार्थी परिषदेचे हेमंत अभ्यंकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर, श्रीनिवास पाटील यांच्यासह प्राचार्य, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.