शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षातही फुलांच्या घटत्या दराने उत्पादकांवर संक्रांत

By admin | Updated: January 22, 2017 23:40 IST

लग्नसराईतही अपेक्षाभंग : मिरजेच्या फूल बाजारात मागणी घटली, शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा ‘व्हेलेंटाईन डे’ची

सदानंद औंधे ल्ल मिरजगणेशोत्सव, दसरा, दिवाळीत कोसळणाऱ्या दराने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. फूलबागा फुलवूनही दर नसल्याने कोमेजून गेलेल्या शेतकऱ्यांवर नव्या वर्षात लग्नसराई सुरू झाल्यानंतरही फुलांचे दर घटल्याने संक्रांत आली आहे. संक्रांत व लग्नसराई सुरू झाल्यानंतरही फुलांचे दर घटल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. फुलांचे दर निम्म्यावर आल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मागणी व दर नसल्याने मिरजेच्या बाजारात फुलांची आवक घटली आहे. यावर्षी फुलांचे उत्पादन व बाजारात आवक मोठी असल्याने गणेशोत्सवातही फुलांचे दर वाढले नाहीत. गणेशोत्सव व दसरा, दिवाळीत झेंडूचा दर ५० रुपयांपर्यंत जात असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात झेंडूची लागवड केली होती. मात्र दरवाढीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची गणेशोत्सव, दसरा व दिवाळीत झेंडूला १० रुपयापेक्षा कमी दर मिळाल्याने निराशा झाली. झेंडूला दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडू शेतातून काढून टाकल्याने झेंडूच्या क्षेत्रात घट झाली आहे. झेंडूची आवक कमी झाली तरीही दर दहा रुपयाच्या वर गेलेला नाही. फुलांना मागणी नसल्याने मिरजेतील बाजारातून होणाऱ्या फुलांच्या निर्यातीत घट झाली आहे. फुलांच्या बाजारात निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील फुलांचीही आवक असल्याचे शेतकरी दीपक कोरे यांनी सांगितले. निशिगंध व गुलाबाचे दरही कमी झाले आहेत. निशिगंधचा ३०० रुपयावरून १०० रुपयावर, तर गुलाबाचा दर प्रती शेकडा ३०० रुपयांवरून २०० रुपयांवर आला आहे. मार्गशीर्ष व संक्रांतीतही फुलांना दर मिळाला नाही. आता लग्नसराईस प्रारंभ झाल्यानंतरही फुलांना मागणी नाही. व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी फुलांना मागणी येत असल्याने फुलांना दरासाठी व्हेलेंटाईन डे ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.धास्ती कायमनोटाबंदीनंतर बाजारात भाज्यांसह सर्वच शेतीमालाचे दर गडगडले आहेत. त्यामुळे यावर्षी व्हॅलेंटाईन डे नेहमीप्रमाणे साजरा होणार का? याबाबत साशंकता असल्याने, हरितगृहात फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी धास्तावले आहेत. व्हॅलेंटाईन डेसाठी मिरजेतून मुंबई, दिल्ली, बेंगलोर या मोठ्या शहरात रेल्वेने फुलांची निर्यात होते. व्हॅलेंटाईन डेसाठी जानेवारीअखेरपासूनच फुलांच्या निर्यातीस सुरूवात होते. हरितगृहातील फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचीही चांगली कमाई होते. मात्र यावर्षी व्हॅलेंटाईन डे साठी फुलांना मागणी कमी असल्याने शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. फुले टिकत नसल्याने पंचाईत