शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रक्तदानाचा नवा विक्रम

By admin | Updated: July 9, 2014 00:39 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : १ हजार ५४७ लोकांनी केले रक्तदान

सांगली : ‘चला रक्तदान करुया, प्रेमाची नाती जोडूया’, असे आवाहन करीत राबविण्यात आलेल्या रक्तदान महाअभियानास सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांगलीतील यापूर्वीचा एकादिवशीचा पावणेपाचशे बाटल्या रक्तदानाचा विक्रम मोडीत काढून श्रीनिवास पाटील मित्रमंडळाने दीड हजार रक्तबाटल्यांचा नवा विक्रम केला. शहरातील सर्व रक्तपेढ्यांनी यात सहभाग घेतला होता. सांगली जिल्ह्यात दररोज २५० आणि वर्षाकाठी ९० हजार रक्तपिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढ्यांनी दिलेल्या या माहितीची दखल घेऊन मंडळाने हा उपक्रम हाती घेतला. सांगलीच्या राजमती भवनात हा कार्यक्रम पार पडला. सकाळी ९ वाजल्यापासून रक्तदात्यांनी गर्दी केली होती. दिवसभरात १ हजार ५४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाअभियानाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. ते म्हणाले की, जिल्ह्यातील दैनंदिन व वार्षिक रक्ताच्या मागणीचे आकडे पाहिल्यानंतर रक्तदानाची किती गरज आहे, याची कल्पना येते. पुण्यातील राम बांगड यांनी रक्तचळवळीत केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. सामाजिक उपक्रमांनी सांगलीची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न अशा उपक्रमातून होत आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, रक्तदानासाठी सांगलीकरांना आवाहन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली, तेव्हा माझ्यावर एक दडपण आले. मी कधीही रक्तदान केले नव्हते. त्यामुळे मी स्वत: रक्तदानाचा निर्णय घेतला. आयुष्यातील पहिले रक्तदान मी सांगलीत केले, या गोष्टीचा अभिमान वाटतो. चांगल्या गोष्टींसाठी लोकांना आवाहन केले, तर लोक त्याला भरभरून प्रतिसाद देतात, याची प्रचिती या अभियानातून आल्याचे मत श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. स्वागत डॉ. शुभांगी पाटील यांनी, सूत्रसंचालन सुमेधा कुंभोजकर-दातार यांनी केले. यावेळी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, रक्ताची नाती संस्थेचे अध्यक्ष राम बांगड, नगसेवक संजय बजाज, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेविका अंजना कुंडले, सुभाष पाटील, मनोज शिंदे, प्रा. पद्माकर जगदाळे, धनंजय कुंडले, हरिदास पाटील, नालसाहब मुल्ला आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)