शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज, कुपवाड एमआयडीसीसाठी नवे वीज उपकेंद्र लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांसमवेत महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी संवाद साधला. खंडित ...

सांगली : सांगली, मिरज व कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांसमवेत महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी संवाद साधला. खंडित विजेसंदर्भात उद्योजकांनी गाऱ्हाणी मांडली. नाळे यांनी तत्काळ महापारेषणच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधून तक्रारींचे निराकरण केले. महावितरणची आर्थिक सद्यस्थिती स्पष्ट करून उद्योजकांनी थकीत व चालू वीज देयके भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले. कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात बैठक झाली. मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, सांगलीचे प्रभारी कार्यकारी अभियंता आशिष मेहता, कृष्णा व्हॅलीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष जयपाल चिंचवडे, सचिव गुंडू एरंडोले, संचालक हरिभाऊ गुरव, अरुण भगत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे, मिरज एमआयडीसीचे अध्यक्ष संजय अराणके, उपाध्यक्ष विनोद पाटील आदी उद्योजक उपस्थित होते.

माधवनगरचे उपविभागीय अभियंता डी. बी. चिप्रीकर, मिरजेचे उपविभागीय अभियंता विजयकुमार आडके, कुपवाडचे शाखा अभियंता प्रकाश पाटील, मिरजेचे विशाल हत्तरगी यांनी बैठकीचे आयोजन केले.

चौकट

मिरज व कुपवाड वसाहतीसाठी नवीन वीज उपकेंद्राची मागणी उद्योजकांनी केली. त्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती पेठकर यांनी दिली. वसाहतीच्या मध्यवर्ती ठिकाणी उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, उद्योजक संघटना व महावितरण अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित करू, असे मुख्य अभियंता निर्मळे म्हणाले. वसाहतीतील ट्रान्सफाॅर्मरच्या क्षमतावाढीची कामे करणार असल्याचेही ते म्हणाले.