मित्र प्रतिष्ठानतर्फे ‘नव्या शैक्षणिक धोरणामुळे निर्माण झालेली आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानात त्या बोलत होत्या. या धोरणाविषयी सखोल मांडणी त्यांनी केली. त्यातील तरतुदी, नव्या अभ्यासक्रमांची मांडणी, शैक्षणिक दिशा स्पष्ट केल्या. धोरणातील विविध बाजूंचा आढावा घेतला. फायदे-तोटे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, या धोरणामध्ये संविधानातील मूळ मूल्ये, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांनाच हरताळ फासला जाण्याचा धोका आहे. यातून सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण होणार आहे. तळागाळातील व आर्थिक पिचलेल्या वर्गातील समाज शिक्षणापासून दुुरावण्याचा धोका आहे.
विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन, जागतिक पुस्तक दिन आणि मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. चारुदत्त भागवत यांच्या जन्मदिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. माधुरी देशमुख यांनी प्रास्ताविक केले. नितीन पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रा. कल्पना भागवत, प्रा. अविनाश सप्रे, कणाद भागवत, श्रीया भागवत, प्रा. बी. एम. सरगर, उमेश देशमुख, आदी उपस्थित होते.