शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईओं’कडून ठेकेदारांची कानउघाडणी

By admin | Updated: May 13, 2014 00:40 IST

पैसे देऊ नका : पंधरा दिवसांत कामे पूर्ण न केल्यास फौजदारी

 सांगली : ठेकेदारांनी ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती आणि गावांमधील समित्यांच्या पदाधिकार्‍यांना एक रूपयाही देऊ नका. कुणी पैसे मागितलेच, तर माझ्याशी संपर्क साधा, जाग्यावर त्या अधिकारी, कर्मचार्‍यास घरी घालविण्यात येईल. पदाधिकारी पैसे मागत असतील, तर त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येईल. पण, ठेकेदारांनी पंधरा दिवसांत कामे पूर्ण केली पाहिजेत, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी ठेकेदारांना दिला. जिल्ह्यातील ६९ गावांतील अपूर्ण पाणी पुरवठा योजनांच्या पार्श्वभूमीवर ठेकेदार, अधिकार्‍यांची जिल्हा परिषदेत बैठक झाली. या बैठकीनंतर लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील पाणी योजनेवर वर्धित वेग, स्वजलधारा, भारत निर्माण आणि पेयजल योजनेच्या माध्यमातून शासन कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. तरीही ठेकेदार पाणी पुरवठा योजनांची कामे वर्षानुवर्षे पूर्ण करीत नाहीत. ठेकेदारांनी गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना एक रूपयाही देऊ नये. ठेकेदारांनीही बोगसगिरी करू नये, कोणत्याही कामात गोलमाल करण्याचा प्रयत्न करू नये, तुम्ही कामे करेक्ट करा. यातूनही एखादा अधिकारी, कर्मचारी पैसे मागत असेल, तर माझ्याशी संपर्क साधावा. जो कोण पैसे मागत असेल त्याला घरी घालविले जाईल, असा इशाराही लोखंडे यांनी दिला. ते म्हणाले की, ठेकेदारांच्या समस्या सोडविल्या जातील. शासनाच्या आराखड्यानुसारच काम झाले पाहिजे. कोणत्याही कामात गोलमाल चालणार नाही. कामात त्रुटी नसतील, तर ठेकेदारांना अधिकार्‍यांच्या मागे लागण्याची गरजच नाही. पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील निधी लगेच मिळेल. (प्रतिनिधी)