शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वांगी येथील पुरातन नरसिंह मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज

By admin | Updated: August 31, 2014 23:49 IST

सुमारे १५० वर्षापूर्वी नरसिंह मंदिराची स्थापना कुलकर्णी समाजाने केली होती.

मोहन मोहिते - वांगी  -वांगी येथील धोकादायक बनलेल्या नरसिंह मंदिराचा जीर्णोध्दार करण्याची गरज आहे. या मंदिराच्या धोकादायक झालेल्या भिंती उतरून घ्याव्यात अशी मागणी होत आहे. वांगी येथे सुमारे १५० वर्षापूर्वी नरसिंह मंदिराची स्थापना कुलकर्णी समाजाने केली होती. गावाच्या बरोबर मध्यभागी उंच अशा ठिकाणी पूर्ण दगडी बांधकाम करून या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. मात्र यानंतर आजपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही.या मंदिरात अंत्यत सुंदर अशा मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या मात्र या मंदिराच्या सर्व बाजूच्या भिंती पडल्या आहेत. तसेच मंदिरावर छतही नाही. देवालयात जाण्यासाठी रस्ता नाही. एखाद्या ग्रामस्थाला दर्शन घ्यायचे असल्यास त्याला रस्त्यावरून परत जावे लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मंदिराच्या उर्वरित राहिलेल्या भिंतीही पडण्याच्या मार्गावर आहेत. मंदिराच्या दोन्ही बाजूने रस्ता आहे. मंदिराच्या राहिलेल्या भिंती कधीही या रस्त्यावर पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कारण येथे राहणाऱ्या नागरिकांची लहान मुले या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर सतत खेळत असतात. तरी या मंदिराचा जीर्णोध्दार ग्रामपंचायतीने किंवा या मंदिराच्या असणाऱ्या मंडळाने करून नरसिंहाचे दर्शन गावाला घडवून आणावे. अन्यथा धोकादायक मंदिराच्या राहिलेल्या भिंती तरी काढून घ्याव्यात.गावातील प्राचीन असणाऱ्या अंबिका मंदिर, महादेव मंदिर, मारूती मंदिर आदी मंदिरांचा लोकवर्गणीतून जीर्णोध्दार करण्यात आला आहे. सर्व मंदिरांच्या सुशोभिकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र एकमेव नरसिंह मंदिर नष्ट होत चालले आहे. तरी या मंदिराचा जीर्णोध्दार ग्रामपंचायतीने किंवा मंदिराच्या मंडळाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.या मंदिराबाबत या मंडळातील सदस्यांना विचारणा केली असता, दुरूस्तीसाठी या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता नाही व असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे या मंदिराच्या जीर्णोध्दारात अडचण निर्माण झाली आहे, असे सांगितले. (वार्ताहर)