विटा येथील बळवंत महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील अर्थशास्राचे प्रा. संजय ठिगळे यांच्या लेखणीतून उतरलेले अर्थभान पुस्तक रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांना देण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. मोरे यांनी महाविद्यालयीन तरुणाईला पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान आले नाही तर आयुष्यात यशस्वी होता येणार नाही. प्रा. संजय ठिगळे यांचे अर्थभान पुस्तक आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे सांगितले.
प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, मी रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. रयत शिक्षण संस्थेचे बळवंत महाविद्यालय नसते तर दुष्काळी भागातील आमच्यासारखे अनेकजण शिक्षणापासून वंचित राहिले असते. माझ्या मनाला जे भावले व अनुभवले ते मी माझ्या या लेखणीतून साकारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास डॉ. एस.एच. कोकरे, सुवर्णा ठिगळे आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो-०८०२२०२१-विटा-बळवंत कॉलेज :
विटा येथील बळवंत महाविद्यालयात प्रा. संजय ठिगळे यांच्या उपस्थितीत लेखक आपल्या भेटीला उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांना पुस्तक भेट देण्यात आले.