शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सामुदायिक लढ्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:20 IST

इस्लामपूर : ‘धनगर’ आणि ‘धनगड’ हा फरक पुढे करून धनगर समाजाला घटनेने देऊ केलेले आरक्षण रोखले गेले आहे. ज्यांना ...

इस्लामपूर : ‘धनगर’ आणि ‘धनगड’ हा फरक पुढे करून धनगर समाजाला घटनेने देऊ केलेले आरक्षण रोखले गेले आहे. ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला, ते कुठल्या कुठे जाऊन पोहोचले, मात्र धनगर समाजाचे आरक्षण नाकारल्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहिला आहे, असे मत माजी मंत्री आणि धनगर समाज महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डांगे यांनी म्हटले आहे की, न्यायमूर्ती चलिया आयोगाने ‘धनगर’ आणि ‘धनगड’ हे दोन्ही शब्द एकार्थी असल्याचे मान्य केले आहे. हा फरक भाषाशास्त्रामुळे दिसत आहे म्हणून भारताच्या घटना प्रबंधकांकडे तशी शिफारस केली. त्यांनीही हे मत मान्य केले असून आपल्या वार्षिक अहवालातील परिशिष्ट दोनमध्ये तसे नमूद केले आहे, असे असूनही १२-१३ वर्षे उलटून गेली तरी केंद्र आणि राज्य शासननिर्णय घेत नाही. त्याचा समाजातील धुरीणांनी गांभीर्याने विचार करून आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून आरक्षणाच्या लढ्याला सामोरे गेले पाहिजे.

ज्यांना घटनेने आरक्षण दिलेले नाही, ते एकीच्या जोरावर आरक्षण पदरात पाडून घेत आहेत. सर्व राजकीय पक्ष त्यांच्यापुढे लोटांगण घालत आहेत. धनगर समाजाने नुसत्या जयंती-पुण्यतिथी साजऱ्या करत बसण्यापेक्षा समाजाच्या विकासाला चालना देणारे आरक्षण सर्वांनी एकत्र येऊन लढा उभा करून मिळविले पाहिजे, अशी भावना डांगे यांनी व्यक्त केली आहे.

फोटो- अण्णा डांगे सिंगल