लेंगरे : भविष्यकाळात विविध अडचणींवर मात करण्यासाठी गलाई व्यावसायिकांचे संघटन होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असा सूर सेलम (तमिळनाडू) येथे गलाई व्यावसायिकांच्या चर्चासत्रात उमटला.
सेलम मराठा सिल्व्हर रिफायनर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये तामिळनाडू व पाँडेचरी राज्यातील २८ जिल्ह्यांमधून पाचशेहून अधिक महाराष्ट्रीयन गलाई बांधव उपस्थित होते. सेलम मराठा सिल्व्हर रिफायनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी स्वागत केले. माजी अध्यक्ष बापूसाहेब बुरसे यांनी प्रास्ताविक केले.
शांताराम शेठ, श्रीधर निकम, लक्ष्मण पाटील, बळवंतराव माने, राजाराम सुर्वे, बळवंत भाऊ जगदाळे, उत्तम पाटणकर, शिवाजीराव माळी, पांडुरंग सुर्वे, मुरलीधर पाटील, मधुकर बाबर, लक्ष्मण धनवडे, संदीप साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
चर्चासत्रांमध्ये श्याम साळुंके, प्रकाश कोळी, भिकूभाऊ कदम, महादेव सुर्वे, संजय जाधव, लक्ष्मण पवार, धनाजी शेळके, महेश वाघमोडे, शहाजीशेठ पाटील, रमेश पाटील, संजय पाटील-माने, डॉ. कृष्णा बोरचाटे, ॲड. अभिजित बाबर, राजाराम बापू आदी उपस्थित होते.
रूपाली गाडवे यांनी सूत्रसंचालन केले. मच्छिंद्र चव्हाण यांनी आभार मानले.