नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने चार विरूद्ध तीन मतांनी सता काबीज केली होती. सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी (साधारण) होते. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रक्रियेत सरपंचपदासाठी विश्वनाथ दुधाळ व राजेश पडळकर यानी तर उपसरपंचपदासाठी विश्वास बाबुराव साबळे व आक्काताई दादा रूपनर यांनी अर्ज दाखल केले.
परंतु ऐनवेळी विरोधी सदस्य अनुपस्थित राहिल्याने विश्वनाथ दुधाळ व विश्वास साबळे यांना अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत माळी यांनी चार विरूद्ध शून्य मतांनी विजयी घोषित केले.
यावेळी राजू माने, आप्पासाहेब जाधव, जनार्दन साबळे, धोंडीराम माने, सुभाष कोळेकर, सचिन मंडले, तात्यासाहेब माने, सोनाली जाधव, सुनीता कोळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो-१५विश्वनाथ दुधाळ
१५विश्वास साबळे