शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तासगावमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा

By admin | Updated: March 13, 2015 23:56 IST

पोटनिवडणुकीबाबत चर्चा होणार

तासगाव : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, या पार्श्वभूमीवर उद्या (शनिवारी) तासगावात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे सर्वांचे ल्ाक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याने, त्यांच्या भूमिकेकडेही मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.आर. आर. आबांच्या निधनामुळे, आता कोणाला संधी, याबाबत मतदारसंघात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नुकताच पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाल्याने आर. आर. पाटील यांच्या घरातून उमेदवार कोण? निवडणूक बिनविरोध होणार का, याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या चार दिवसात जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हाच विषय चर्चिला जात आहे. अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने तयारी करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीत पाटील यांच्या घरातील उमेदवार आणि निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, जबाबदारी हाच मुख्य विषय असणार आहे. राष्ट्रवादीत वरिष्ठ स्तरावर झालेले निर्णय, भविष्यातील वाटचाल अशा वेगवेगळ्या मुद्यांवर या मेळाव्यात चर्चा होणे अपेक्षित आहे. दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रमुखांशी संवाद साधून, नंतर मेळावा होणार आहे. या मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीबाबत धोरणात्मक निर्णय होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)संयुक्त मेळावापोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी आणि निवडणुकीत पक्षसंघटनेची जबाबदारी, या मुख्य विषयांच्या अनुषंगाने उद्या तासगावात तासगाव, कवठेमहांकाळ या दोन्ही तालुक्यांच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे.