शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे वरातीमागून घोडे

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

गोंधळनामा सुरूच : पक्ष सोडून गेल्यानंतर नोटिसा

सांगली : नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गळती लागलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा गोंधळनामा सुरूच आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकून अन्य पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांमार्फत नोटिसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे घोडे सध्या वरातीमागून धावताना दिसत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीला पक्षीय इतिहासातील सर्वात मोठी गळती लागली आहे. गेल्या दोन वर्षात अर्धा डझन नेत्यांची पक्षातून गच्छंती झाली. माजी महापौर इद्रिस नायकवडी, खासदार संजय पाटील, जतचे विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने अशी यादी आता लांबतच चालली आहे. यातील इद्रिस नायकवडी, विलासराव जगताप यांची पक्षाने एका नोटिसीनंतर हकालपट्टी केली. इतर नेत्यांबाबत वेगळीच प्रक्रिया राबविण्यात आली. संजय पाटील यांना नोटीस बजावण्यात आली, पण नोटिसीला उत्तर देण्यापूर्वीच ते भाजपमध्ये दाखल झाले होते. शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी भाजपच्या मिरवणुकीत सहभाग घेतल्यानंतरही त्यांना कोणतीही नोटीस पक्षाने बजावली नाही. घोरपडेंनाही भाजपशी संगत केली म्हणून आजवर कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. ही राष्ट्रवादीची राजकीय अगतिकता आहे.प्रत्येकाला वेगवेगळे नियम लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या नियमावलीचाही गोंधळ दिसून येतो. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात पक्षातून बाहेर पडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला. अशा लोकांनी लवकरात लवकर पक्ष सोडावा, असा सल्ला पाटील यांनी दिला. त्यानंतर घोरपडेंनी त्यांच्या या सल्ल्याची खिल्ली उडविताना, आम्ही कधीच पक्ष सोडला आहे, हवी तर हकालपट्टी करा, असे सांगून टाकले. बाबर आणि भीमराव माने यांनी या गोष्टी सांगण्याचीही गरज नाही, कारण त्यांनी पक्ष केव्हाचाच सोडलेला आहे. तरीही जिल्हाध्यक्षांनी आता त्यांना नोटीस बजावली आहे. वरातीमागून चालणारे राष्ट्रवादीचे घोडे विधानसभेच्या मैदानात काय करणार?, असा सवाल आता कार्यकर्तेच उपस्थित करू लागले आहेत. (प्रतिनिधी)उशिराची सोडचिठ्ठीअनिल बाबर आणि भीमराव माने यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरा विवाह झाल्यानंतर आता पहिल्या विवाहासाठी सोडचिठ्ठीची नोटीस बजावण्यात आल्यासारखा हा प्रकार आहे! पक्षप्रवेशानंतर या नोटिसांना काय अर्थ आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.