शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कोकळे सोसायटीत राष्ट्रवादीचा धुव्वाआबा-दादा पॅनेलची बाजी

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

तेरापैकी बारा जागांवर विजय

कवठेमहांकाळ : संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कोकळे विकास सोसायटी निवडणुकीत दोन माजी मंत्र्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांचा पराभव करून १३ पैकी १२ जागा जिंंकल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावली.कोकळे विकास सोसायटीसाठी बुधवारी मतदान होऊन मतमोजणी झाली. सभासदांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे कट्टर समर्थक धनाजी पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील आबा-दादा पॅनेलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलला पराभूत केले. आबा-दादा पॅनेलच्या सत्ता देऊन १२ जागा मिळवून दिल्या, तर याच सभासदांनी राष्ट्रवादी पॅनेलच्या पारड्यात अवघी एक जागा टाकली.कोकळे विकास सोसायटीची निवडणूक लागल्यानंतर धनाजी पाटील, नंदकुमार पाटील या दोन कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादीविरोधात पॅनेल उभे केले. ही निवडणूक कोण जिंंकणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे सत्ताधारी जिंकणार, की विरोधक सत्ता खेचून आणणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर सभासदांनी ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आणि कोकळे विकास सोसायटीत चमत्कार घडविला. कोकळ्यातील धनाजी पाटील, नंदकुमार पाटील या निवडणुकीत एकत्रित आले. त्यांनी एकदिलाने निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करून सत्ता हस्तगत केली. याउलट राष्ट्रवादीचे महांकाली साखर कारखान्याचे माजी संचालक बळवंत पवार, विद्यमान संचालक बाळासाहेब ओलेकर, माजी संचालक सूर्यकांत पाटील, माजी अध्यक्ष पोपटराव पाटील यांच्यात एकी आढळून आली नाही. त्यामुळेच धनाजी आणि नंदकुमार या दोन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला अस्मान दाखविले. रूपेश कदम, सतीश नागने, रमेश महाजन, धनाजी भोसले, भारत पांढरे, श्रीरंग ओलेकर, राजू अजेष्ठ, युवराज पाटील, विजय ओलेकर, बाळासाहेब जानकर या दिग्गज कार्यकर्त्यांनी धनाजी पाटील आणि नंदकुमार पाटील यांना मोलाची साथ दिली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आबा-दादा पॅनेलच्या समर्थकांनी जल्लोष केला. (वार्ताहर)राष्ट्रवादीच्या माने विजेत्याकोकळे विकास सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत अजितराव घोरपडे आणि प्रतीक पाटील यांच्या गटाचे विक्रम कणसे, शहाजी पाटील, भास्कर पाटील, सचिन पाटील, हैबती पांढरे, बाळासाहेब शिंंदे, मधुकर माळी, दादासाहेब पवार, बाजीराव ओलेकर, मारुती लंगोटे, बाळासाहेब कांबळे, संपता ओलेकर हे विजय झाले, तर राष्ट्रवादीच्या मालन माने या एकमेव उमेदवार निवडून आल्या.