शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे चंद्रकांत हाक्के भाजपच्या वाटेवर

By admin | Updated: October 28, 2015 00:01 IST

राष्ट्रवादीला फटका

कवठेमहांकाळ : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा बॅँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत हाक्के यांनी व्यासपीठावर उपस्थिती लावली. हाक्के भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत त्यांच्या या उपस्थितीने दिले. याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू असून, राष्ट्रवादीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण आहे.राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक कार्यकर्ते सैरभैर झाले असून राष्ट्रवादी पक्षाला अवघ्या काही महिन्यातच गळती लागली. या नाराजीचा फायदा घेण्यासाठी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम तसेच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी मतदारसंघात जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीचे मातब्बर कार्यकर्ते फोडण्यात व आपल्याकडे खेचण्यात बाजी मारली.महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते व माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर, माजी उपसभापती अनिल शिंदे, विद्यमान सभापती वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्य शिवाजी चंदनशिवे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. त्यानंतरही अनेक कार्यकर्ते खा. पाटील यांच्या संपर्कात असल्याचे समजते. आता राष्ट्रवादी पक्षाचे कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रमुख नेते व जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के हेही भाजपच्या संपर्कात असल्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी आरेवाडी येथील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमात हाक्के यांनी टेंभू योजनेसह विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले व व्यासपीठावर जाहीर उपस्थिती लावली. त्यामुळे हाक्के भाजपच्या वाटेवर असल्याचा संशय दाट झाला असून, ते भाजपप्रवेश नेमका कधी करणार आणि राष्ट्रवादी कशासाठी सोडणार, याची चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू झाली आहे. (वार्ताहर)राष्ट्रवादीला फटकाहाक्के भाजपमध्ये गेल्यास मोठा फटका राष्ट्रवादी कॉँग्रेसला बसणार आहे. कारण हाक्के यांना मानणारा तालुक्यात मोठा गट आहे. ढालगाव परिसरावर गेली १०-१५ वर्षे त्यांचे प्राबल्य आहे. त्यांच्या पत्नी राधाबाई हाक्के जिल्हा परिषदेच्या माजी सभापती असून विद्यमान सदस्या आहेत.