लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : रासायनिक खतांची दरवाढ केंद्र शासनाने तातडीने मागे घ्यावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन उभे करू असा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी त्यांनी रासायनिक खत तसेच इंधन दरवाढीचा निषेध करून तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे निवेदन दिले.
तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत आहोत. केंद्र सरकारने अन्यायी दरवाढ केली आहे.
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, केंद्र शासनाने वाढत्या महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले. आता खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा डाव खेळत आहेत.
राज्य सरचिटणीस चिमण डांगे, महिला राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस छाया पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, युवक तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, सुस्मिता जाधव, रोझा किणीकर यांनी दरवाढीचा निषेध केला.
शहराध्यक्ष शहाजी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत पाटील, एम. जी. पाटील, अल्लाउद्दीन चौगुले, सुभाष सूर्यवंशी, आनंदराव पाटील, अॅड. विश्वासराव पाटील, जि. प. सदस्य संजीव पाटील उपस्थित होते. युवती शहराध्यक्ष प्रियांका साळुंखे हिने आभार मानले.