शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला आघाडीचे चूल पेटवा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गॅस दरवाढीच्या प्रश्नावर सांगलीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्यावतीने मंगळवारी ‘चूल पेटवा’ आंदोलन करून संताप व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गॅस दरवाढीच्या प्रश्नावर सांगलीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्यावतीने मंगळवारी ‘चूल पेटवा’ आंदोलन करून संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

जिल्हा परिषदेसमोरील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीच्यावतीने याठिकाणी चूल पेटवून त्यावर भाकऱ्या करण्यात आल्या. चुलीवरच्या भाकऱ्या वाटून केंद्र शासनाच्या गॅस दरवाढीविरोधात निदर्शने केली. यावेळी विनया पाठक म्हणाल्या की, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर अन्यायकारक भाववाढ करून सामान्य गृहिणीचे कंबरडे मोडले. सामान्य लोकांबद्दल या सरकारला काहीही कळवळा नाही. केंद्र सरकारने तातडीने ही दरवाढ मागे घ्यावी.

यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा विनया पाठक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्योती आदाटे, डॉ. छाया जाधव, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, आशा पाटील, जसबीर कौर खंगुरा, जयश्री भोसले, प्रियांका तुपलोंडे, सुनिता लालवानी, जयश्री चौगुले, संध्या आवळे, संगीता मासाळ, अर्चना भोई, सुरेखा मासाळ, संगीता मोठे, वैशाली कांबळे आदी उपस्थित होत्या.

चौकट

केंद्र शासनाचा निषेध

‘महंगाई से मच गया हाहाकार, अब नही चाहिये मोदी सरकार’, ‘भाजप सरकार होश में आओ, जनता से तुम ना टकराओ’ अशा घोषणा देत महिला आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध केला.