शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडे, अनिल बाबर यांना राष्ट्रवादीचे पुन्हा निमंत्रण

By admin | Updated: August 9, 2014 00:29 IST

कार्यकर्त्यांत उत्सुकता : पडझड रोखण्याचे प्रयत्न

सांगली : माजी मंत्री अजितराव घोरपडे व माजी आमदार अनिल बाबर यांच्यासह महायुतीच्या संपर्कात असलेल्या नेत्यांना गोंजारणे राष्ट्रवादीकडून सुरूच आहे. या नेत्यांना येत्या सोमवारी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगलीत होणाऱ्या मेळाव्याला निमंत्रण देण्यात आले असून, हे नेते उपस्थित राहणार का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. अजितराव घोरपडे यांनी तासगाव-कवठेमहांकाळमधून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, तर खानापूरचे नेते माजी आमदार अनिल बाबर यांनी नुकतीच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांचाही शिवसेनेतील प्रवेश निश्चित आहे. घोरपडे, बाबर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते महायुतीच्या संपर्कात आहेत. त्यात जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश आहे, पण अद्यापही या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आजही ते राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे सोमवारी पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यासाठी या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याला अपवाद ठरले आहेत ते जतचे विलासराव जगताप. राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या जगतापांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील यांचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी जगताप वगळता इतर नेत्यांना मेळाव्याचे निमंत्रण दिल्याचे सांगितले. शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जिल्ह्यात सर्व्हेक्षण केले आहे. पक्षाची ताकद वाढल्याने सांगली, मिरज आणि खानापूर-आटपाडी या तीन मतदारसंघांसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. प्रदेश समितीला जिल्ह्याचा अहवाल दिला आहे. (प्रतिनिधी)