शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आष्टा परिसरात राष्ट्रवादीचे शुद्धीकरण

By admin | Updated: June 1, 2017 23:46 IST

आष्टा परिसरात राष्ट्रवादीचे शुद्धीकरण

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : वैभव शिंदे भाजपमध्ये गेले असले तरी, त्यांचे वडील विलासराव शिंदे हे आजही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आष्ट्यात विलासराव शिंदे यांचाच शब्द प्रमाण मानला जात असल्याने राष्ट्रवादीच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील गटासोबत असलेले जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांनी, शिंदे व शिगावचे स्वरूप पाटील यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे शुध्दीकरणच झाल्याची प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे दिली.आष्टा पालिकेवर शिंदे गटाचे बहुमत असले तरी, आमदार जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांनी एकत्र येऊन सत्ता मिळविली आहे. सध्या पालिकेत २३ नगरसेवक आहेत. त्यामध्ये शिंदे गटाकडे नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्यासह सारिका मदने, झुंझारराव पाटील, विशाल शिंदे, धैर्यशील शिंदे, शैलेश सावंत, बाळासाहेब सिध्द, संगीता सूर्यवंशी, शहनवाज देवळे, शारदा खोत, प्रतिभा पेटारे, मंगलादेवी शिंदे असे ११, तर आमदार पाटील गटाकडे रुक्मिणी अवघडे, विजय मोरे, प्रकाश घस्ते, अर्जुन माने, मनीषा जाधव, पुष्पलता माळी, राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष जगन्नाथ बसुगडे, तेजश्री बोंडे, शकीर मुजावर हे ९ नगरसेवक आहेत. विलासराव शिंदे यांना मानणारे नगरसेवक इस्लामपूर येथील वैभव शिंदे यांच्या भाजपप्रवेश कार्यक्रमास आले नव्हते. नगराध्यक्षा स्नेहा माळी आणि शिंदे गटाचे नगरसेवक आजही राष्ट्रवादीतच आहेत. विलासराव शिंदे जो आदेश देतील, त्यानुसार पालिकेच्या राजकारणात सक्रिय असल्याचे नगराध्यक्षा सौ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.याउलट बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदे यांना पाडून निवडून आलेले अपक्ष, पण आ. पाटील गटासोबत असणारे संभाजी कचरे परिसरात पक्ष भक्कम करण्याच्या तयारीला लागले आहेत. वैभव शिंदे व स्वरूप पाटील यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे शुद्धीकरण झाले आहे. आष्टा परिसरात आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार, शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. त्यामुळे वैभव शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीवर कसलाही परिणाम होणार नाही, असे कचरे यांनी स्पष्ट केले.स्वरूप पाटील यांच्याबद्दल ते म्हणाले, की सर्वसामान्यांच्या मनातून उतरलेल्यांबाबत आपल्याला काहीच बोलायचे नाही. दरम्यान, या प्रवेशाने आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार, याकडे लक्ष लागले आहे.निष्ठावान कोण, गद्दार कोण?आमदार जयंत पाटील यांनी आष्टा शहरातील निष्ठावान आनंदराव शिंदे, धोंडीराम मस्के, बाबासाहेब ढोले, शंकरराव शिंदे, वसंत आवटी, बाळासाहेब वग्याणी आणि राजारामबापू उद्योग समूहाची उभारणी करण्यात आघाडीवर असणारे नानासाहेब फडतरे यांना सबुरीचा सल्ला दिल्यानेच येथे शिंदे गट वरचढ ठरला आहे. यापुढील काळात निष्ठावान आणि गद्दार कोण, याची तपासणी आ. पाटील यांनी करावी, अशी मागणी होत आहे.मंत्रालयात पुन्हा घुसण्यासाठीच....भाजप प्रवेशाच्या आदल्या दिवसापर्यंत, भाजपमध्ये जाणार नसल्याचे आ. पाटील यांना सांगणारे स्वरूप पाटील भाजप प्रवेशाच्या रांगेत पुढे होते. यापूर्वी आ. पाटील मंत्री असताना त्यांच्या मंत्रालयात वाऱ्या असायच्या. आता आ. पाटील यांच्याकडे मंत्रीपद नसल्याने स्वरूप पाटील यांना मंत्रालयाचे दरवाजे बंद झाले आहेत. मंत्रालयात पुन्हा घुसण्यासाठीच स्वरूप पाटील सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आता भाजपच्या वळचणीला जाऊन बसले आहेत.