शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तासगावमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ६ च्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादीच्या सादिया शेख या १८० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार तायरा मुजावर यांचा पराभव केला. या विजयाने राष्टÑवादीला पुन्हा संधी मिळाली असून भाजपला जोरदार धक्का बसला आहे.राष्टÑवादीच्या तत्कालीन नगरसेविका रेहाना मुल्ला यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचे पक्षप्रतोद अनिल ...

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : तासगाव नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ६ च्या पोटनिवडणुकीत राष्टÑवादीच्या सादिया शेख या १८० मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार तायरा मुजावर यांचा पराभव केला. या विजयाने राष्टÑवादीला पुन्हा संधी मिळाली असून भाजपला जोरदार धक्का बसला आहे.राष्टÑवादीच्या तत्कालीन नगरसेविका रेहाना मुल्ला यांच्या जात प्रमाणपत्रावर भाजपचे पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे मुल्ला यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने थेट कमळ चिन्हावर उमेदवारी न देता, नगरसेवक जाफर मुजावर यांची बहीण तायरा मुजावर यांना भाजप पुरस्कृत उमेदवारी दिली होती, तर राष्टÑवादीकडून नवख्या सादिया शेख यांना उमेदवारी दिली होती.भाजपकडून राष्टÑवादीला शह देण्यासाठी नगरसेवक पद रद्द करण्याकरिता पाठपुरावा झाला होता. त्यातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली होती. याची जिल्हाभर चर्चा झाली होती. त्यामुळे या प्रभागातील निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले होते.या निवडणुकीत मुजावर यांना ७५०, तर शेख यांना ९३० मते पडली, तर नोटाला २२ मते मिळाली. राष्टÑवादीच्या शेख यांनी मुजावर यांचा १८० मतांनी पराभव केला. या निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरविल्यामुळे ५९.६९ टक्के मतदान झाले होते.गुरुवारी निकाल काय लागणार, याची धाकधूक दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र मारामारीच्या प्रकरणामुळे गुन्हे असल्याने प्रमुख कार्यकर्ते गायब होते. सकाळी दहा वाजता तासगाव तहसील कार्यालयातील मतमोजणी कक्षात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले स्वत: मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. दहा वाजता मतमोजणी सुरु झाली.राष्टÑवादीचे मताधिक्य घटलेवर्षभरापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत प्रभाग ६ मधून राष्टÑवादीचे दोन्ही उमेदवार शहरातील उच्चांकी मताधिक्याने विजयी झाले होते. या प्रभागात मुस्लिम व्होट बँक मोठी असल्याने हा प्रभाग राष्टÑवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पोटनिवडणुकीत राष्टÑवादीच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी, मताधिक्यात मात्र घट झाल्याचे चित्र आहे.