शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी काँग्रेसला डावलून राष्ट्रवादीची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या नव्या महापौरपदासाठी महिन्याभराचा कालावधी असताना, सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मित्रपक्ष असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या नव्या महापौरपदासाठी महिन्याभराचा कालावधी असताना, सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला डावलून महापौरपदासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांसह नेत्यांमध्येही नाराजी दिसत आहे. त्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांना महापौरपदाचे स्वप्न पडू लागल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागणार आहे.

महापालिकेच्या विद्यमान महापौर गीता सुतार यांची मुदत ८ फेब्रुवारीला संपत आहे. नूतन महापौरपदाची निवड फेब्रुवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. पुढील महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह विरोधकांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपमध्ये निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, ॲड. स्वाती शिंदे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यात भाजपमधील काही नगरसेवक स्थायी समितीत डावलल्याने नाराज आहेत. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगले असतानाच, विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. महापालिकेची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढली होती. काँग्रेसला २०, तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या होत्या. महापालिकेत काँग्रेस मोठा भाऊ असतानाही राष्ट्रवादीने महापौरपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी भाजपमधील नाराजांशी संपर्क वाढविला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी नाराजांना संपर्क करून दिला जात आहे. बागवान यांनी महापौरपदासाठी जुळवाजु‌ळव सुरू केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेत्यांसह कोणत्याच नेत्यांशी चर्चा न करता राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.

चौकट

राष्ट्रवादीतही नाराजी

मैनुद्दीन बागवान महाआघाडीच्या काळात १७ महिने महापौरपदावर होते. राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत अनेक अनुभवी नगरसेवक असताना, पुन्हा बागवान यांनाच संधी कशासाठी, असा सवालही या नाराज नगरसेवकांकडून केला जात आहे.

चौकट

कोट

राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी मोर्चेबांधणी केली जात असली, तरी त्यांचे नेते अथवा नगरसेवकांनी काँग्रेससोबत कसलीची चर्चा केलेली नाही. महापालिकेत राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस नगरसेवकांची संख्या अधिक आहे. शिवाय काँग्रेसकडेही इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महापौरपदासाठी काँग्रेसकडूनच उमेदवार रिंगणात असेल. - उत्तम साखळकर, विरोधी पक्षनेते, महापालिका