शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मांजर्डे मतदार संघावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व

By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST

भाजपचा अस्तित्वासाठी संघर्ष : संजयकाकांकडून पक्षबांधणीसाठी हालचाली

संजयकुमार चव्हाण -मांजर्डे तासगाव तालुक्यातील मांजर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ लोकसंख्येने मोठा व जास्त मतदारसंख्या असलेला गण आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. या गणातील काही गावे विसापूर सर्कलमध्ये, तर काही गावांचा तासगाव मतदार संघामध्ये समावेश असल्याने खानापूर, आटपाडी व तासगाव विधानसभा मतदार संघात या जि. प. गणाला वेगळे महत्त्व आले आहे.या गणातून मांजर्डेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकरदादा पाटील, वायफळेचे ज्येष्ठ नेते साहेबराव दादा पाटील, हातनूरचे मोहनअण्णा पाटील, तसेच पेडचे पंचायत समिती सदस्य प्रभाकर पाटील यांचे वर्चस्व आहे. ही सर्व नेतेमंडळी आर. आर. पाटील आबा यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखली जातात. या मतदार संघात भाजप मात्र संघर्ष करताना दिसत आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे समर्थक, वायफळेचे सुखदेव पाटील व हातनूरचे विलासभाऊ पाटील यांना संघर्ष करावा लागणार आहे. तालुका पातळीवर काही पदे नसल्याने भाजपचे कार्यकर्ते मात्र टिवल्या-बावल्या करतानाच दिसत आहेत.सांगली जिल्हा बँकेत संचालक पद मांजर्डेचे कमलताई पाटील यांना, तर सूतगिरणीमध्ये पेडचे विलास खाडे यांची वर्णी लागली आहे. परंतु बाजार समितीसाठी या जि. प. गणातून इच्छुकांची गर्दी आहे. मागील पंचायत समितीला साहेबराव पाटील यांना डावलल्याने ते नाराज होते. त्यामुळे बाजार समितीवर निवड करून त्यांची नाराजी दूर केली होती.यावेळीही साहेबरावदादा पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली तर साहेबराव पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे, परंतु इच्छुक जास्त असल्याने नाराजांचा सामना राष्ट्रवादीला करावा लागणार आहे. किंदरवाडी, विजयनगर, कचरेवाडी, तरसेवाडी या गावातून बाजार समितीला इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या गावातील कार्यकर्त्यांना थोपविण्यात वरिष्ठ नेत्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे. सुुभाषआप्पा पाटील यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन मागील विधानसभेत अपक्ष उमेदवारी लढविल्याने हातनूर गावाला तालुक्याच्या राजकारणात डावलले जात आहे, असे दिसते.बाजार समितीच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या माध्यमातून या भागातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. मांजर्डेचे दिनकरदादा पाटील हे सध्यातरी या गणाचे नेतृत्व करीत आहेत. या जि. प. गणातील महत्त्वाचे निर्णय दिनकरदादा पाटील हेच घेतात. नाराजांना शांत बसविण्यात त्यांना कसरत करावी लागणार आहे.भाजपच्या बांधणीसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी वायफळचे सुखदेव पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर घेतले आहे. आमदार अनिल बाबर यांचाही एक नवीन गट या भागात तयार होत आहे. राष्ट्रवादीची नाराज आणखी काही मंडळी गळाला लागतील काय, यावर त्यांचे लक्ष आहे.